Tomato Cultivation : एकात्मिक टोमॅटो लागवड तंत्राचा अवलंब करा

वडवळच्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा एक उत्तम नमुना देशासमोर ठेवला आहे. परंतु बदलते वातावरण आणि पारंपरिक रासायनिक शेती पद्धतीमुळे टोमॅटोला विविध समस्येने घेरल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
Tomato
Tomato Agrowon

वडवळ नागनाथ, ता. चाकूर : वडवळच्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा एक उत्तम नमुना देशासमोर ठेवला आहे. परंतु बदलते वातावरण आणि पारंपरिक रासायनिक शेती पद्धतीमुळे (Chemical farming practices) टोमॅटोला विविध समस्येने घेरल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

यासाठी टोमॅटो उत्पादक (Tomato Producer) शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने, तसेच देशातील अनेक संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या एकात्मिक लागवड तंत्राचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वनस्पती कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे यांनी व्यक्त केले.

सकाळ ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त ॲग्रोवन आणि यारा फर्टिलायझर यांच्या संयुक्त विद्यमाने वडवळ नागनाथ येथे मंगळवारी (ता. १९) घेतलेल्या टोमॅटो पीक खत व्यवस्थापनावरील ‘ॲग्रोवन संवाद’ चर्चासत्रात डॉ. श्री. भामरे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मुरलीधर सोनकांबळे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे, उपसरपंच बालाजी गंदगे, कृषी सहायक सत्यवान सुरवसे, यारा खत कंपनीचे प्रतिनिधी अक्षय देशमुख उपस्थिती होते.

Tomato
Tomato Crop Disease : टोमॅटो पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक

या वेळी डॉ. भामरे म्हणाले, की शेतकऱ्यांनी टोमॅटोतील एकात्मिक कीड, रोग, तण आणि अन्नद्रव्य तंत्रज्ञानाबाबत ॲग्रोवनसारख्या वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या माहितीपूर्ण लेखांचा अभ्यास आणि संग्रह करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनमुळेच मला माझ्या विद्यार्थिदशेपासून आजच्या व्यावसायिक कृषी क्षेत्रातील कार्यासाठी मोठी मदत झाली आहे. अशा कृषी क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या देशातील पहिल्या वृत्तपत्राने यशस्वीपणे १८ वर्षे पूर्ण केली आहेत याबद्दल त्यांनी सकाळ मीडिया ग्रुपला शुभेच्छा दिल्या.

यारा फर्टिलायझरचे श्री. जगदाळे यांनी शेतकऱ्यांना अन्नद्रव्य, एकात्मिक कीड, रोग, तन व्यवस्थापनाबाबत तसेच कंपनीच्या विविध प्रॉडक्टबद्दल सविस्तर माहिती देत दोन नवीन प्रॉडक्टचे या वेळी शेतकऱ्यांच्या हस्ते फीत कापून लॉन्चिंग केले.

कृषी सहायक श्री. सुरवसे यांनी शेतीसंबंधी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. ॲग्रोवनचे जितेंद्र बरकते यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले, तर ‘सकाळ’चे बातमीदार संतोष आचवले यांनी आभार मानले.

कार्यक्रमास सतीश शिंदे, लक्ष्मण येवंदगे, रामराव बेरकिळे, बालाजी भोजने, प्रभाकर भेटे, उमाकांत नवने, रामचंद्र मुर्के, बाबू गव्हाणे, मुनाफ पठाण, माणिक कदम, सुलेमान शेख, मन्सूर शेख, शिवशंकर मोहनाळे, ऋषिकेश मिरकले, बबन भेटे, अमित कोरे, हणमंत बरले, दस्तगीर शेख, सुरेश कसबे यांच्यासह वडवळ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com