Agricultural Market Hiwargaon Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Auction : हिवरगाव उपबाजार आवारात टोमॅटो लिलाव सुरू

Agricultural Market Hiwargaon : सिन्नर उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगाव उपबाजारात आवारात स्वातंत्र्यदिनापासून (ता. १५) टोमॅटो लिलाव सुरू झाले.

Team Agrowon

Nashik News : सिन्नर उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगाव उपबाजारात आवारात स्वातंत्र्यदिनापासून (ता. १५) टोमॅटो लिलाव सुरू झाले. पहिल्या दिवशी टोमॅटोची सुमारे ८३०० क्रेट आवक झाली. त्यास सरासरी ६०० रुपये प्रतिक्रेट दर मिळाला. पहिल्याच दिवशी जवळपास १५० वाहनांतून आवक झाली होती.

हिवरगाव हे सिन्नर व निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर येत असल्याने तसेच हिवरगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीची जवळच मार्केटची सुविधा उपलब्ध नसल्याने याबाबत बाजार समितीने विक्री व्यवस्थेत वेळ, श्रम व पैसा खर्च करावा लागणार नाही या हेतुने हिवरगाव उपबाजार येथे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते टोमॅटो लिलावाला सुरुवात करण्यात आली. या वेळी बाजार समितीच्या उपबाजार हिवरगाव भुईकाटा व कॅबिन लोकार्पण व उपबाजार कार्यालयाचे भुमिपूजन करण्यात आले. उदय सांगळे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. तर या वेळी तानाजी निकम यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ, बाजार समितीचे माजी सभापती डॉ. रवींद्र पवार, ज्ञानेश्वर गाडे, विजय जाधव, सरपंच ईश्वर माळी, ग्रामपंचायत सदस्य बबन पोमनर, सुनील ठाकरे, बाळू पोमनर तसेच केशवराव कोकाटे, बाजार समितीच्या उपसभापती सिधू कोकाटे, संचालक श्रीकृष्ण घुमरे, नवनाथ घुगे, शरद थोरात, जालिंदर थोरात, सुनील चकोर, रवींद्र शेळके, प्रकाश तुपे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

टोमॅटो शेतीमाल प्रतवारी करून क्रेटस्मध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने या वेळी करण्यात आले. येथे दर सोमवारी ते रविवारी सप्ताहातील सर्व दिवस दुपारी २ ते सायंकाळी ७ पर्यंत टोमॅटो शेतीमालाचे लिलाव सुरू राहतील.

शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी बांधावर किंवा शिवारमापाने विक्री न करता बाजार आवारातच विक्रीसाठी आणावा व शेतीमाल विक्रीची रोख रक्कम घेऊन जावे, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले. बाजार समितीचे संचालक रवींद्र शेळके यांनी सूत्रसंचालन केले. बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण घुमरे यांनी आभार मानले.

आवक दरस्थिती अशी (प्रतिक्रेट रुपये)

तारीख आवक (क्रेट) किमान कमाल सरासरी

१५/८ ८,३०० २०० १,१०० ६००

१६/८ ६,५६७ २०० ६५० ५५०

१७/८ ९,८३३ २०० ७०० ५५०

१८/८ ८,८६७ २०० ७७५ ६००

१९/८ ११,७०० २०० ६५० ५५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT