Tomato Auction : देवगाव रंगारी येथील उपबाजारात टोमॅटोचे लिलाव सुरू

Kannad APMC : कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत देवगाव रंगारी येथील उपबाजार समितीच्या आवारात प्रथमच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या मालासाठी जाहीर लिलाव योजनेचा प्रारंभ झाला आहे.
Tomato Auction
Tomato AuctionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत देवगाव रंगारी येथील उपबाजार समितीच्या आवारात प्रथमच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या मालासाठी जाहीर लिलाव योजनेचा प्रारंभ कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. मनोज राठोड यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १६) करण्यात आला. प्रारंभप्रसंगी टोमॅटोच्या प्रतिकॅरेटला १३५० रुपये असा उच्चांकी दर मिळाला.

देवगांव रंगारी, ताड पिंपळगावसह परिसरातील गांवात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले जाते. त्यामुळे या परिसरात टोमॅटोची मोठी आवक असते. स्थानिक व परराज्यातील व्यापारी टमाटे खरेदी करत असत. त्यात एखाद्या दिवशी आवक वाढली की मोजकेच व्यापारी असल्याने भाव मिळत नसे. त्यामुळे शेतकऱ्याचा झालेला खर्चसुद्धा निघत नव्हता. यासाठी येथील बाजार समितीत जाहीर लिलावाद्वारे खरेदी-विक्री व्हावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादकांनी केली होती.

Tomato Auction
Tomato Auction : हिवरगाव उपबाजार आवारात टोमॅटो लिलावास सुरुवात

या समस्या लक्षात घेऊन बाजार समितीच्या वतीने देवगाव रंगारी येथील उपबाजारात प्रथमच टोमॅटोचे लिलाव सुरू करण्यात आले. यात पहिल्याच दिवशी उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी प्रतिसाद नोंदवला. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात बाजार समिती सभापती डॉ. मनोज राठोड व संचालक मंडळाच्या हस्ते टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. टोमॅटो खरेदी प्रारंभप्रसंगी ७० पेक्षा जास्त लहान-मोठी वाहने व ट्रॅक्टरमधून साडेतीन हजारांपेक्षा जास्त कॅरेट भरून टोमॅटोची आवक झाली. स्थानिक व बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांच्या चढाओढीत ४५० ते १३५० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला.

Tomato Auction
Tomato Auction : संगमनेर बाजार समितीत टोमॅटोचा लिलाव सुरू

या वेळी माजी सभापती राजकुमार गंगवाल, उपसभापती जयेश बोरसे, रमेश जाधव, संचालक चंद्रभान गोरे, राजेंद्र शेलार, कांताराम सोनवणे, दिलीप बनकर, युवराज चव्हाण, कैलास अकोलकर, किशोर पवार, साईनाथ आल्लाड, शिवाजी थोरात, बाळासाहेब जाधव, देविदास मनगटे, अब्दुल जावेद, युसूफ शेख, अजबसिंग राजपुत, जनार्दन बरबंडे, शेख शेरुभाई, उपसरपंच आसिफ पठाण, सुशील गंगवाल, कासीम शेख, मनोज चपके, गोरख रावते, सन्मती ठोळे, विवेक शेळके, साहेबराव गोरे, रामदास रावते, अनिस कुरैशी, संतोष बोडखे, किशोर कदम, राहुल रहाणे, अमोल माळी, सचिव बाळू पवार, कर्मचारी पवन पाटील, कुणाल कदम, सतीश करडे, लखन शिनगारे, संजय पवार, सतीश राठोड आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती. बाजार समितीचे सचिव बाळू पवार यांनी आभार मानले.

विक्री झालेल्या शेतीमालाची रक्कम रोखीने घ्यावी, तसेच दर सोमवारी लिलाव खरेदी बंद राहील. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्येच विक्रीस आणावा. समितीच्या वतीने सर्वेतोपरी सहकार्य करण्यात येईल.
डॉ. मनोज राठोड, सभापती, बाजार समिती, कन्नड
विविध भागांतून व्यापारी खरेदीसाठी येणार असल्याने शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळणार आहे. तरी परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांनी आपले टोमॅटो विक्रीसाठी बाजार समीतीत आणावेत.
चंद्रभान गोरे, ‌संचालक, बाजार समिती, देवगाव रंगारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com