Tomato Auction : संगमनेर बाजार समितीत टोमॅटोचा लिलाव सुरू

Sangamner APMC : संगमनेर येथील कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (१ एप्रिल) टोमॅटो शेतीमालाचे जाहीर लिलाव सुरू झाले आहे. बाजार समितीत लिलाव सुरू केल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
Tomato Auction
Tomato AuctionAgrowon

Nagar News : संगमनेर येथील कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (१ एप्रिल) टोमॅटो शेतीमालाचे जाहीर लिलाव सुरू झाले आहे. बाजार समितीत लिलाव सुरू केल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

Tomato Auction
Tomato Food Processing : टोमॅटोपासून पावडर निर्मिती

संगमनेर येथील बाजार समितीत टोमॅटोची खरेदी-विक्री केली जायची. मात्र दिवसभरासाठी अन्य बाजार समितीत असलेल्या दरानुसारच खरेदी व्हायची. आता सोमवारपासून टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरू झाले आहेत. टोमॅटोचे जाहीर लिलाव केल्याने व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. लिलाव होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये टोमॅटो खरेदीसाठी चढाओढ होणार आहे.

Tomato Auction
Tomato Crop Management : टोमॅटो लागवडीत कीड-रोग, खत व्यवस्थापनावर भर

लिलावामुळे माल विक्री केल्यानंतर बाजार समिती पक्की हिशोबपट्टी देवून तत्काळ रोख पेमेंट दिले जाते. शेतीमाल विक्रीसाठी आणताना योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत बाजार समितीच्या गेटजवळील पटांगणात घेऊन यावा, असे अवाहन सभापती शंकर खेमनर व सचिव सतीष गुंजाळ यांनी केले आहे.

संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत आता दररोज टोमॅटोचे लिलाव सुरू केले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. अधिक पारदर्शकता येण्याला मदत होणार आहे.
शंकर खेमनर, सभापती, संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com