E Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

E Crop Survey : ई-पीकपाहणीसाठी आज शेवटचा दिवस

Crop Survey Deadline : राज्यात रब्बी हंगामाची ई-पीकपाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीचा बुधवारी (ता. १५) शेवटचा दिवस आहे. मुदतीत ई-पीकपाहणी न झालेल्या क्षेत्राबाबत नोंदणीची जबाबदारी तलाठीस्तरावर देण्यात आलेली आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्यात रब्बी हंगामाची ई-पीकपाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीचा बुधवारी (ता. १५) शेवटचा दिवस आहे. मुदतीत ई-पीकपाहणी न झालेल्या क्षेत्राबाबत नोंदणीची जबाबदारी तलाठीस्तरावर देण्यात आलेली आहे.

राज्यात पूर्वी राज्य शासनाच्या प्रणालीतून ई-पीकपाहणी केली जात होती. आता केंद्राने डीसीएस (डिजिटल क्रॉप सर्व्हे) प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे राज्याने आधीची प्रणाली बंद करीत पूर्णतः केंद्र शासनाच्या पद्धतीने ई-पीकपाहणी करण्याची पद्धत स्वीकारली आहे.

अर्थात, यामुळे शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवरून ई-पीकपाहणी करण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा आलेला नाही. रब्बी हंगामाची शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी एक डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, रब्बी हंगामातील पिकांची ई-पीकपाहणी करण्याचे राहून गेले असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आज दिवसभरात पीकपाहणीची प्रक्रिया पूर्ण करावी. पिकाचे नुकसान झाल्यास ई-पीकपाहणीवरील नोंदी महत्त्वाच्या ठरतात. तसेच, अनुदान, विमा व शेतीमालाच्या विक्री प्रक्रियेतदेखील ई-पीकपाहणीचा पुरावा मोलाचा ठरतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Delay: केंद्राच्या कांदा खरेदीचा बोजवारा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Agriculture Department Distributes Laptops: तेरा हजार कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप

Rohit Pawar Hunger Strike: मंत्री महाजनांच्या आश्वासनानंतर रोहित पवारांचे आंदोलन स्थगित

Online Fertilizers Sale: कोल्हापुरात ऑनलाइन खतविक्रीला विरोध कायम

Lumpy Skin Disease Vaccination: लम्पी प्रतिबंधासाठी ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप

SCROLL FOR NEXT