E-Crop Survey Training : बांधावर जाऊन ई-पीक पाहणीचे मार्गदर्शन

Crop Inspection Guidance : भोर तालुक्यातील निगुडघर मंडलातील शेतकऱ्याना रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीला सुरुवात झाली आहे. ई-पीक पाहणी कशी करायची आणि त्याचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
E-Crop Survey
E-Crop Survey Agrowon
Published on
Updated on

Bhor News : भोर तालुक्यातील निगुडघर मंडलातील शेतकऱ्याना रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीला सुरुवात झाली आहे. ई-पीक पाहणी कशी करायची आणि त्याचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शेतकरी स्तराचा कालावधी १ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ तर सहायक स्तर १६ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राहणार आहे. सातबारावर रब्बी हंगामातील पिकांची ई- पीक पाहणी नुसार नोंदणी केली जाणार आहे.

E-Crop Survey
E-Crop Survey : ई-पीकपाहणीला प्रतिसाद कमीच

तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली निगुडघर येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन मंडल अधिकारी रूपाली गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र बेंद्रे,अमिर शेख, विकास कारळे, महसूल सहायक नीलेश गायकवाड, बबन अंबिके, पांडुरंग किंद्रे ई-पीक पाहणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उपस्थित होते.

शासनाच्या रब्बी हंगाम २०२४ ई-पीक पाहणी डीजीटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्याचे काम मंडल अधिकारी, तलाठी व नेमून दिलेल्या सहायक यांच्या सहकार्याने सुरू असून यामध्ये मोबाइल ॲपद्वारे शेतकरी स्तर व सहायक स्तर अशी पिकांची नोंद करण्यात येणार आहे.

E-Crop Survey
E Crop Survey : ई-पीकपाहणीबाबत मुजोर यंत्रणेला महसूल सचिवांची तंबी

...अशी होईल ई-पीक पाहणी

मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणी नोंद

डिजिटल क्रॉपमध्ये गटाच्या हद्दीवर आधारित रेखांश अक्षांश बंधनकारक

जोपर्यंत संबंधित खातेदार, सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तोपर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी अपलोड करता येत नाही.

रेखांश अक्षांश बंधनकारक असल्यामुळे गाव नकाशे अद्ययावत असल्याची खात्री भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे.

सदर ई-पीक पाहणी केल्यामुळे पीक वीमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती एमएसपी अंतर्गत पिकाची नोंद

ॲग्रोस्टॅकअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. तरी तालुक्यातील सर्व खातेदारांनी आपल्या शेतजमिनीची ई-पीक पाहणी करून सातबारा अद्ययावत करून घ्यावेत.
राजेंद्र नजन, तहसीलदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com