White Grub Outbreak Agrowon
ॲग्रो विशेष

Humani Attack : हुमणी अत्यंत घातक कीड असल्याने एकात्मिक नियंत्रण करा

White Grub Outbreak : एक अळी प्रति चौरस मीटर किंवा एका झाडावर सरासरी २० किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे असणे ही या अळीची आर्थिक नुकसान पातळी असते.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : हुमणी ही अत्यंत घातक कीड असून, त्याचे वेळेवरच एकात्मिक व सामुदायिक नियंत्रण करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगांबर पटाईत यांनी दिला.

स्थानिक पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शुक्रवारी (ता. १) ऑनलाइन पद्धतीने आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.

तसेच निवृत्त विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह केव्हीके येथील विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. संजूला भावर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. पाटगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

डॉ. पटाईत म्हणाले, हुमणी अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. एक अळी प्रति चौरस मीटर किंवा एका झाडावर सरासरी २० किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे असणे ही या अळीची आर्थिक नुकसान पातळी असते. अशावेळी एकात्मिक व्यवस्थापन उपाय योजावेत. याच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

हुमणीच्या व्यवस्थापनासाठी त्याचा जीवनक्रम जाणून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. शंखी गोगलगायच्या व्यवस्थापनासाठी देखील एकात्मिक आणि सामुदायिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी तर आभार डॉ. संजूला भावर यांनी यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

Maharashtra Economic Survey: अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी मंजूर; आर्थिक पाहणी अहवालात सरकारची माहिती

Livestock Health: कोथळीत जनावरांना ‘लाळ्या खुरकूत’चा प्रादुर्भाव

Sugarcane Production : उन्हापासून उसाचे उत्पादन वाचवण्यासाठी सेंद्रिय उपाय

Khapli Wheat: खपली गहू पेरणीत खानदेशात घट

SCROLL FOR NEXT