Onion Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : कांद्यासाठी बियाणे टाकण्याची लगबग

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात बागायती असलेल्या बऱ्याच भागात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षाप्रमाणे यंदाही उत्पादकांनी नर्सरीमध्ये बियाणे टाकण्यास गेल्या आठवड्यापासूनच सुरुवात केली आहे.

अजून पंधरा दिवस ही मोहीम सुरू राहील. रोपवाटिकेत येणाऱ्या रोपांची येणाऱ्या दोन महिन्यांत हजारो हेक्टरवर उन्हाळी कांद्याची पुनर्लागवड होणार आहेत. त्यासाठी शेतकरी आता तयारीला लागले आहेत.

उन्हाळी हंगामात पिकणारा कांदा हा चाळीमध्ये भरून ठेवता येतो किंवा येणाऱ्या दिवाळीपर्यंत टिकवून ठेवता येतो. त्यामुळे शेतकरी भाव पाहून टप्प्याटप्याने विक्री करतात. कांदा काढणीवेळी कांद्याला भाव कमी असले तरीसुद्धा चाळीत किंवा व्यवस्थित ठिकाणी भरून ठेवल्यास हा कांदा निश्चितपणे भाव देऊन जातो. त्याच्या विक्रीतून बऱ्यापैकी रक्कम कांदा उत्पादकांच्या पदरात पडण्यास मदत होते. म्हणून उन्हाळी हंगामात पाणी असलेल्या ठिकाणी कांद्याची लागवड दरवर्षी होताना दिसून येते.

येत्या पंधरवड्यापर्यंत जवळपास चारशे एकर क्षेत्रावर कांदा बियाण्याच्या रोपवाटिका करण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. बाजारात बियाणे दीड ते दोन हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. काही शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडून व शेतकऱ्यांकडून बाराशे ते पंधराशे रुपये प्रति किलोप्रमाणे बियाणे खरेदी करीत आहेत.

ते नर्सरीमध्ये टाकण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील किनगाव, चिंचोली, अडावद, डांभूर्णी, डोनगाव, चुंचाळे, नायगाव, वर्डी, माचला, मंगरूळ, नारोद, खरद, रुखनखेडे, लासूर, मराठे, गणपूर आदी शिवारात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. शिवाय गांधली, पिळोदे, धरणगाव, पष्टाने यांसह चाळीसगाव व पाचोरा तालुक्यांतील काही भागात कांदा लागवड केली जाते.

डिसेंबरमध्ये होणार लागवड

साधारणपणे दोन महिन्यांत नर्सरीत कांदा रोप तयार झाल्यावर त्याची पुनर्लागवड करण्यास सुरुवात होते. अगोदर बियाणे टाकलेल्या शेतकऱ्यांची लागवड एक डिसेंबरपासून सुरू होणे शक्य आहे.

पूर्ण डिसेंबर महिना ही लागवड सुरू राहील. मार्चअखेर व पंधरा एप्रिलपर्यंत हा कांदा काढणीवर येतो. त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन व्यापारी जागेवरच खरेदी करून येथूनच दक्षिण भारतासह अन्य भागात हा कांदा पाठवतात. कांद्याचे अर्थकारण मोठे असले तरी त्याच्यातून निर्माण होणारा रोजगारही खूप मोठा आहे. कोटींच्या हिशोबाने विकणारा कांदा लाखोंच्या हिशोबाने मजुरांना कामही मिळवून देतो, हे वेगळे सांगणे ना लगे!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chitale Dairy : जातिवंत पशुपैदाशीचे तंत्रज्ञान पोहोचविणारी चितळे डेअरी

Fertilizer : निसर्ग क्रॉप केअरची युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित खते

State Agriculture Corporation Land : वित्त विभागाच्या विरोधाला केराची टोपली? शेती महामंडळाची ५.४८ हेक्टर जमीन शिर्डी संस्थानला मोफत

Onion Cultivation : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

BJP Candidate List : महायुतीच्या जागा वाटपाच्या रस्सीखेचात भाजपची बाजी; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT