Tiger missing Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Habitat : रत्नागिरी जिल्ह्याच्या वनक्षेत्रात चार नर वाघांचे वास्तव्य

Tiger Spotted In Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या वनक्षेत्रात चार नर जातीच्या वाघांचे अस्तित्व सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेऱ्यात बंदिस्त झाले आहे आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या वनक्षेत्रात चार नर जातीच्या वाघांचे अस्तित्व सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेऱ्यात बंदिस्त झाले आहे आहेत. याचबरोबर ६ ब्लॅक पँथर, मोठ्या प्रमाणात वानर, माकडे असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली आहे.

वनविभाग चिपळूण-रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी व ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ५0) शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप, वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळेत प्रास्ताविक करताना त्या बोलत होत्या.

गिरिजा देसाई म्हणाल्या, एकूण वन क्षेत्रापैकी ९९ टक्के क्षेत्र हे खासगी मालकीचे असून केवळ १ टक्का वनक्षेत्र वनविभागाकडे आहे. मात्र असे असले तरी सर्वच वनक्षेत्रात विविध प्राण्यांचे वास्तव्य आहे. खासगी क्षेत्रात ६ ब्लॅक पॅथर, वानर, माकडांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे केले नमूद वनविभागाला काहीही करता येत नसून करायचे झाल्यास अनेक अडचणी येतात.

जिल्ह्यात वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चार वाघांचे अस्तित्व दिसून आले आहे. ही बाब महत्त्वाची आहे. त्याचबरोबर ६ ब्लॅक पँथर तसेच मोठ्या प्रमाणात वानर, माकड दिसून येतात.

दरम्यान, जिल्ह्याला लागलेल्या वनक्षेत्रात पर्यावरण दृष्टीने सुखद मानले जात आहेत. आतापर्यंत अधूनमधून कुठे ना कुठे वाघ दिसल्याच्या बातम्या पसरल्यावर त्याबाबत दुजोरा मात्र मिळत नव्हता. मात्र आता वन खात्याने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT