
Solapur News : येडशी अभयारण्यात राहणाऱ्या वाघाने पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील कोरेगाव वनपरिक्षेत्राजवळील भागात प्रवेश करून मंगळवारी (ता. २२) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेतकरी सुनील खेलबा चोरमले यांच्या खोराडी शेतातील गोठ्यात बांधलेल्या कालवडवर वाघाने हल्ला केला.
या हल्ल्यात कालवड गंभीर जखमी झाली असून तिचा मागचा भाग वाघाने फस्त केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सोमवारी (ता. २१) गावातील जत्रा असल्याने संध्याकाळी सहाच्या सुमारास शेतकरी सुनील चोरमले यांनी आपली सर्व आठ जनावरे गोठ्यात बांधून घरी परतले होते.
मात्र, मंगळवारी पहाटे गोठ्यात गेले असता जनावरे भेदरलेली दिसली. त्यावेळी एक कालवड गायब असल्याचे लक्षात आले. नजीक पाहणी केली असता कालवडीला गोठ्यातून जवळपास सहाशे मीटरपर्यंत फरफटत नेल्याचे दिसून आले. शोध घेत असताना एका झुडपाजवळ ती कालवड मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याला खोल जखमा झाल्या होत्या आणि मागचा भाग वाघाने खाल्ल्याचे दिसून आला.
वाघाच्या पायांचे ठसे
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कालवडीच्या मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच घटनास्थळी वाघाचे ठसेही आढळून आले असून हल्ला वाघाने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी केवळ आठ दिवसांपूर्वी उक्कडगाव शिवारात वाघाने बैल आणि गाय यांच्यावर हल्ला करून ठार केले होते.त्यामुळे परिसरात पुन्हा वाघाच्या उपस्थितीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.