Yedshi Sanctuary Tiger : येडशी अभयारण्यातून वाघ बेपत्ता, वनविभागाची शोधमोहीम सुरू

Forest Department Yedashi : वालवड परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने तत्काळ तिथे पाहणी केली. मात्र प्रत्यक्षात वाघाचे कोणतेही ठसे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Tiger missing
Tiger missingAgrowon
Published on
Updated on

Yedashi Wild : येडशी अभयारण्य परिसरातील वाघ गेले महिनाभरापासून अभयारण्यात कुठेही दिसून आलेला नसून, तो तलाव परिसरातील पाणथळ भागात लपून बसला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वाघाच्या हालचालींविषयी खात्रीशीर माहिती नसल्याने विभागाने सध्या शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

वालवड परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने तत्काळ तिथे पाहणी केली. मात्र प्रत्यक्षात वाघाचे कोणतेही ठसे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.या पार्श्‍वभूमीवर, ढेंबरेवाडी हद्दीत वाघ येण्याची शक्यता लक्षात घेता त्या मार्गावर तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाघाने २२ एप्रिल रोजी कोरेगाव शिवारातील कालवडीवर हल्ला केला होता. त्यानंतर तो पुन्हा कुठेही दिसून आला नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

Tiger missing
Painganga Tiger Project : पैनगंगा अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाच्या हालचालींना वेग ; वनमंत्र्यांकडून हिरवी झेंडी

याआधी ९ एप्रिल रोजी वाघ शेवटचा अभयारण्यात दिसून आला होता. त्यानंतर त्याची कोणतीही नोंद अभयारण्यात झालेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून या वाघाचा वावर येडशी अभयारण्य, बार्शी परिक्षेत्र तसेच खासगी क्षेत्रांमध्ये सतत सुरू होता. सुरुवातीच्या काळात त्याने अनेक पाळीव प्राण्यांचा बळी घेतला. वनविभागाच्या निरीक्षणानुसार, की वाघ अत्यंत चलाख आणि हुशार आहे.

पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांनंतर त्याचा पाठलाग सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात आल्याने, त्याने आता जंगलातील रानडुक्कर, हरिण आणि अन्य वन्यप्राण्यांची शिकार करायला सुरुवात केली आहे. वाघाच्या शिकारीचा मागोवा घेतला असता, त्याने दर एक ते चार दिवसांत शिकार केल्याचे आढळले आहे.

शेवटचा हल्ला कोरेगाव शिवारात केल्यानंतर वाघ पुन्हा कुठेही दिसून आलेला नाही. त्यामुळे वनविभागाची चिंता वाढली असून, वाघाच्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने कॅमेरे लावणे, पथक तैनात करणे यासह विविध यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. लवकरच वाघाचा ठावठिकाणा लागेल, असा विश्‍वास वनविभाग व्यक्त करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com