Water Tanker
Water Tanker Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : सिंदखेडराजा तालुक्यातील तीन गावांची टँकरने भागतेय तहान

Team Agrowon

Buldhana News : तालुक्यातटंचाईची तीव्रता वाढली आहे. तीन गावांतील हजारो नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागवली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची भीषण टंचाई जाणू लागली असून, ४८ गावांतील ६२ विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटले आहेत.

उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाई वाढली. मागील चार महिन्यांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे नागरिक टंचाईंने त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील गावांमध्ये टंचाईवर प्रशासनाकडून योजना करण्यात आल्या असून ४८ गावांतील ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. ३ गावांना टँकरने पुरवठा करण्यात येत आहे.

तालुक्यातील बुट्टा २, धांदरवाडी २, डावरगाव १, रुम्हणा २, सोनोशी १, अंचली ३, खैरव बारलिंगा २, धानोरा १, नाईक नगर २, भंडारी १, जागदरी १, देऊळगाव कोळ १, आडगाव राजा १, वडाळी १, शेंदुर्जन ६, पिंपळगाव लेंडी १, दत्तापूर १, सेलू भोसा १, वसंत नगर १, सायाळा १, सोनोशी १, गोरेगाव १, खामगाव १, पांगरखेड १, खामगाव १, जांभोरा २, निमगाव वायाळ १, शिंदी १, सिंदखेड राजा १, विझोरा १, पिंपळगाव लेंडी १, शिवनी टाका १, पिंपळगावखुटा १,

उमरद २, केशव शिवणी १, केशव शिवणी तांडा १, वाकत जहागीर १, डावरगाव १, राजेगाव ३, बाळ समुद्र १ , ढोरवी १, पळसखेड चक्का २ गावांतील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर सावरगाव माळ, किनगाव राजा व सोंयदेव या तीन गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खडकपूर्णा नदीकाठच्या गावांना सुद्धा यावर्षी पाणी टंचाईच्या झळा पोहचत आहेत. नदीकाठी असलेल्या साठेगांव, दिग्रस खुर्द, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा, तढेगांव, राहेरी, लिंगा, देवखेड यासह अनेक गावांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे

जनावरांना पाणीटंचाईचा फटका

तालुक्यातील जनावरांना पाणीटंचाईचा फटका बसत असून शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून जनावरांना पाजावे लागत आहे. ज्या गावांना पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे. त्या टँकरच्या प्रस्तावासोबत पशुधन विभागाकडून जनावरांची आकडेवारी देण्यात आली आहे. जनावरांना पाणी पुरवठा केला जाईल असे प्रमाणपत्र दिले जाते. परंतु प्रत्यक्षामध्ये जनावरांना पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांबरोबरच जनावरांना सुद्धा पाणीटंचाईचा फटका पोहोचत आहे. जनावरांना पाणीटंचाईचा फटका

तालुक्यातील जनावरांना पाणीटंचाईचा फटका बसत असून शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून जनावरांना पाजावे लागत आहे. ज्या गावांना पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे. त्या टँकरच्या प्रस्तावासोबत पशुधन विभागाकडून जनावरांची आकडेवारी देण्यात आली आहे. जनावरांना पाणी पुरवठा केला जाईल असे प्रमाणपत्र दिले जाते. परंतु प्रत्यक्षामध्ये जनावरांना पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांबरोबरच जनावरांना सुद्धा पाणीटंचाईचा फटका पोहोचत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Landslides In Kolhapur : भूस्खलनाचा धोका! कोल्हापुरातील अनेक गावांना सूचना

Kajwa Mahotsav : काजव्यांना नष्ट करणारा महोत्सव

Milk Price Issue : दूधदर समस्येवर रास्त तोडगा

Milk Rate : दूधदराचा प्रश्‍न सोडवा : राजू शेट्टी

Agriculture College, Pune : पुणे कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. माने

SCROLL FOR NEXT