Water Stock : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

Water Crisis : सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा असून, ६ हजार ७७० वाड्या आणि २६९४ गावांत ३३७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Water Issue
Water IssueAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात वळीव पावसाचा तडाखा सुरू असला, तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा असून, ६ हजार ७७० वाड्या आणि २६९४ गावांत ३३७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र हा तोकडा आधार ग्रामीण भागाचे जीव बेहाल करत असून, महिलांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

राज्यात गेल्या आठवडाभरात वळीव पाऊस झाल्याने शेतीच्या पाण्याचे प्रश्‍न काही प्रमाणात कमी झाला असला, तरी पिण्याच्या पाण्याने महाराष्ट्र बेहाल झाला आहे. राज्यातील विविध शहरांसह गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा आता तळ गाठत असून मॉन्सूनचा पाऊस सुरू होऊन पाणी पिण्यायोग्य होण्यास दीड महिन्याहून अधिक कालावधी आहे.

Water Issue
Dam Water Stock : धरणांच्या पाणीपातळीत घट

सध्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ २३.४३ टक्के असून, मागील वर्षीच्या तुलनेत तो १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. मध्यम प्रकल्पांत ३५ टक्के, तर लघू पाटबंधारे प्रकल्पांत २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला असून पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. संभाजीनगरातील मोठ्या प्रकल्पांत केवळ १०.९६, मध्यम प्रकल्पांत १३.८२ आणि लघू पाटबंधारे प्रकल्पांत केवळ ७.७२ टक्के पाणीसाठा आहे. त्यापाठोपाठा नाशिक आणि पुणे विभागांत पाण्याचा साठा कमी आहे.

Water Issue
Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, सध्या राज्यातील २६९४ गावे आणि ६७७० वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या खासगी आणि सरकारी ३३७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी मेच्या दुसऱ्या आठवड्यात केवळ २७० गावांत आणि ६३९ गावांत २१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.

नाशिक विभागात ७१५ टँकर कार्यरत असून, येते ६८३ गावे आणि २३६८ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक आणि अहमदनगर येथे पाण्याची टंचाई जाणवत असून, नाशिकमधील ३१५ आणि नगरमधील २९१ गावांत टँकर सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील प्रकल्पांनी तळ गाठल्याने येथे तब्बल १६७० टँकर सुरू आहेत. येथे ११५३ गावे आणि ४४१ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव या तालुक्यांमध्ये पाण्याची मोठी टंचाई जाणवत आह

जनावरांचे हाल...

राज्यातील लहान मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होत असल्याने शेतीचे पाणी बंद केले आहे. जेथे पाण्याचा मुबलक साठा आहे तेथेही आठ दिवसांपेक्षा जास्त काळ उपसाबंदी लागू केली आहे.

त्यामुळे उन्हाळी आणि नगदी पिके धोक्यात आली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पाणी आणि चाऱ्याअभावी जनावरे सांभाळणे मुश्कील झाल्याने विक्री करावी लागत आहे. परिणामी जनावरांचे दरही पडले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com