Climate Change  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदलावर दिल्लीत तीन दिवसीय परिषद; कृषी क्षेत्रातील आव्हानांवर होणार चर्चा

Agricultural Challenges: कृषी आणि हवामान विज्ञानाचा परस्परसंबंध, पाणी व्यवस्थापन, हवामान बदलाचा शेतीवर होणारा प्रभाव यावरही या परिषदेत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

Dhananjay Sanap

environmental policies : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि हार्वर्ड विश्वविद्यालय, यूएसएच्या दोन संस्थांच्या सहयोगाने 'भारत २०४७: हवामन-अनुकूल भविष्य निर्माण' या विषयावर एक परिषद आयोजित केली आहे. ही परिषद १९ ते २२ मार्च २०२५ दरम्यान नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या लक्ष्मी मित्तल आणि कुटुंब दक्षिण आशिया इन्स्टिट्यूट आणि सलाटा इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट अँड सस्टेनेबिलिटी यांनी केलं आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे.

या परिषदेमध्ये देशातील हवामान बदलाच्या अनुषंगाने धोरण, कार्यक्रम आणि क्षेत्रीय स्तरावर उपाययोजनांसंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच कृषी आणि हवामान विज्ञानाचा परस्परसंबंध, पाणी व्यवस्थापन, हवामान बदलाचा शेतीवर होणारा प्रभाव यावरही या परिषदेत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

नीती आयोगाच्या उपाध्यक्ष सुमन बेरी, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांच्या उपस्थितीत परिषदेतचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्थांचा तज्ञांचा गट परिषदेतील चर्चेसाठी उपस्थित राहणार आहे. ह्या सत्रांमध्ये हार्वर्ड विश्वविद्यालयाचे प्रोफेसर, आणि तज्ञ देखील सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या चार दिवसीय परिषदेमध्ये तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये हवामान विज्ञान आणि त्याचा पाणी व कृषीवर होणारा प्रभाव, आरोग्य, काम, आणि बांधकाम वातावरण यांचा समावेश आहे.

उष्णतेचे परिणाम, पावसामधील बदल, आणि पाणी व्यवस्थापनाच्या आव्हानांवर चर्चा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कसे प्रभावी उपाय सुचवता येतील, यावरही या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

Crop Loan : खरिपासाठी ११७९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

Irrigation Subsidy : ठिबक अनुदानाबाबत संभ्रम

Farmer Foreign Tour : राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्याची संधी

SCROLL FOR NEXT