Climate Change NICRA Project : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज; 'एनआयसीआरए' प्रकल्पातून अभ्यास सुरू असल्याची लोकसभेत दिली माहिती

Tackle Climate Change : दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, पूर यासारख्या हवामान बदलांच्या परिणामांना तोंड देण्यासाठी हवामान बदल अनुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी मंगळवारी (ता.११) लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
Climate Change NICRA Project
Climate Change NICRA ProjectAgrowon
Published on
Updated on

India Climate Action : भारतीय कृषी संशोधन परिषद 'नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रेझिलिएंट अॅग्रिकल्चर' नावाचा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पातून पिकं, पशूधन, मत्स्यपालन, फलोत्पादन यासह कृषी क्षेत्रावर हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास करण्यात येत आहेत. तसेच दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, पूर यासारख्या हवामान बदलांच्या परिणामांना तोंड देण्यासाठी हवामान बदल अनुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी मंगळवारी (ता.११) लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

या प्रकल्पातून पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) प्रोटोकॉलनुसार ६५१ कृषी जिल्ह्यात जिल्हा पातळीवर हवामान बदलाचा धोका आणि संवेदनशीलता मूल्यांकन करण्यात आलं आहे. हवामान बदल संवेदनशील ३१० जिल्ह्यांपैकी १०९ जिल्ह्यांना अति संवेदनशील आणि २०१ जिल्ह्यांची अत्यंत संवेदनशील म्हणून वर्गवारी करण्यात आली आहे.

त्यामुळे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जिल्हानिहाय हवामान अनुकल पिकांचे वाण आणि व्यवस्थापन पद्धतीची शिफारस करण्यासाठी जिल्हा आकस्मिक योजना तयार करण्यात आल्याचं मंत्री ठाकूर यांनी उत्तरात स्पष्ट केलं आहे.

Climate Change NICRA Project
Climate Revolution: हरितक्रांती, धवल क्रांतीनंतर आता ‘हवामान क्रांती’ची गरज

हवामान बदलामुळे देशातील कोरडवाहूसह बागायत भात, गहू, मका पिकांची उत्पादकता कमी होण्याची शक्यता आहे, असं या प्रकल्पात केलेल्या अभ्यासात दिसून आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. तसेच या प्रकल्पातून २८ राज्यातील १५१ जिल्ह्यातील हवामान संवेदनशील ४४८ गावांमध्ये हवामान बदल संवेदन गावात समाविष्ट करण्यात येणार आहे, असंही मंत्री ठाकूर यांनी उत्तरात सांगितलं.

हवामान बदल अनुकूल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या विविध आयामाबद्दल जागृत केलं जाणार आहे. त्यासाठी कार्यक्रमही आयोजित केले जातात. तसेच हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानातून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत, असंही ठाकूर यांनी सांगितलं.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने मागील १० वर्षात २ हजार ९०० वाण प्रसिद्ध केले. त्यापैकी २ हजार ६६१ वाणा एक किंवा अधिक जैविक व अजैविक तणाना सहनशील आहेत, असंही मंत्री ठाकूर यांनी सांगितलं.

दरम्यान, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने हवामान बदलांवरील उपाययोजनांसाठी निधी देताना आखडता हात घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या उपाययोजना म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी ठरते, असं जाणकार सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com