Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Theft Case : कांदा मार्केटमध्ये चोरी प्रकरणी अभोणा येथे तिघांना अटक

Onion Market : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट परिसरात ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पट्ट्यांची चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Team Agrowon

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट परिसरात ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पट्ट्यांची चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस तपासात स्वप्नील ऊर्फ कमलाकर सुदाम गावित (रा. मोहमुख), विकी राजाराम जोपळे (रा. अंबिका ओझर) आणि सचिन धर्मराज बठाले (रा. ओझर) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांनी मिळून सदर चोरी केल्याचे सांगितले.

पोलिसांनी तीनही संशयितांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या चौकशीत इतर चोऱ्यांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बाळासाहेब वामन मोरे (गोसराणे, ता. कळवण) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या ट्रॅक्टरला लावलेल्या एकूण पाच हायड्रोलिक डाबर पट्टया, प्रत्येकी किंमत २ हजार ५०० रुपये अशा एकूण १२ हजार ५०० रुपयांच्या चोरीप्रकरणी अभोणा पोलिसांनी तपास सुरू केला.

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक के. व्ही. पवार आणि त्यांच्या पथकाने केली. यामुळे अभोणा परिसरात चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: तरुण शेतकऱ्याने विविध मागण्यांसाठी घेतली नदीत उडी; शेतकरी बेपत्ता,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू

Wildlife Terror : खरिपात वाघासोबत हत्तींची दहशत

Nanded Fertilizer Scam : जैविक खतांच्या थेट विक्रीप्रकरणी चौकशी सुरू

Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु

Fishing Season : नव्या हंगामात दर्यातून मासळीचे घबाड

SCROLL FOR NEXT