Crop Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Issue : सततच्या पावसामुळे खरीप पिकांना धोका

Rain Update : अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Akola News : अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतातील कामे ठप्प आहेत. रिमझिम पावसामुळे डवरणी, वखरणी झाली नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. गवताचे प्रमाण वाढले असून, याचा उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.

अकोट तालुक्यात सातत्याने पाऊस तसेच पावसाळी वातावरण आहे. यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी पिके धोक्यात आली आहेत. सूर्यप्रकाश मिळत नसल्याने सोयाबीनच्या झाडांवर फुलांचे प्रमाण खूप कमी आहे.

ज्या झाडांवर फुले लागली, तीही बुरशीजन्य रोगांमुळे झाडांवरून गळून पडत आहेत. सोयाबीनची कायिक वाढही अवास्तव होत आहे. हे सर्व चित्र सोयाबीनच्या नुकसानीचे संकेत देत आहे.

या वर्षी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यातच कपाशीची लागवड केलेली आहे. हे पीक दोन महिन्यांचे झाले आहे. काही ठिकाणी फुलोऱ्याची अवस्था सुरू आहे. शिवाय, काही शेतांमध्ये झाडांवर बोंडेही लागली.

सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांना बाधक परिस्थिती तयार झाली. सोयाबीनच्या पिकांचीही अशीच अवस्था आहे. यंदा मूग, उडदाची अत्यल्प लागवड असून, फुलोऱ्यातील या पिकांनाही फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अकोलखेड महसूल मंडलामधील शेतकरी करू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT