Fodder Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Fire News : जनावरांचा हजारो पेंड्या चारा आगीत जळाला

Fire News : शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात सात शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीच्या चाऱ्याच्या हजारो पेंढ्यांचे जळाल्या.

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील उत्रौली, हातनोशी व बाजारवाडी येथे शनिवारी (ता.१३) शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात सात शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीच्या चाऱ्याच्या हजारो पेंढ्यांचे जळाल्या.

‘महावितरण’ने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. उत्रौलीमधील ३, बाजारवाडी व हातनोशीतील प्रत्येकी दोन शेतकऱ्यांचा चारा जळून खाक झाला.

हातनोशी व बाजारवाडी गावांच्या सीमेवर बाजारवाडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठीच्या रोहित्रामध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे बाजारवारीडीतील शेतकरी पांडुरंग खोपडे यांच्या गवताच्या ४ पेंढ्या, तुकाराम शिंदे यांच्या गवताच्या २ हजार पेंढ्या आणि हातनोशी गावातील रामचंद्र भिलारे यांच्या गवताच्या ३ हजार पेंढ्या व ५०० भाताच्या पेंढ्या आणि बाळासाहेब भिलारे यांच्या भाताच्या ७०० पेंढ्या जळून खाक झाल्या. ‘महावितरण’ने रोहित्राच्या परिसरातील साफसफाई न केल्यामुळे आग पसरली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. आगीत दत्तात्रेय शिवतरे, गणपत शिवतरे, बबन सोनू शिंदे यांच्या मालकीच्या १२ हजार गवताच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. यामध्ये दत्तात्रेय यांच्या ५ हजार, गणपत यांच्या ४ हजार, बबन यांच्या ३ हजार पेंढ्यांचा समावेश आहे.

‘भरपाईसाठी प्रस्ताव पाठविणार’

‘महावितरण’चे सहायक अभियंता संदीप गादे म्हणाले, ‘‘संबंधित गावांचा वीजपुरवठा सुरळीत केलेला आहे. ‘महावितरण’च्या तंत्रज्ञांकडून आगीचे कारण तपासून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT