Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : हजारो एकरांवरील पिके जळण्याच्या मार्गावर

Water Scarcity : ऐन उन्हाळ्यात भीमा नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे काही दिवस तरी पिकांना जीवदान मिळणार आहे.

Team Agrowon

Nira Narsinhpur News : ऐन उन्हाळ्यात भीमा नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे काही दिवस तरी पिकांना जीवदान मिळणार आहे. मात्र, नीरा नदी मागील सात महिन्यांपासून कोरडी ठाक पडली आहे. पाण्याअभावी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो एकरांवरील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

पिण्याच्या पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडून बंधारे भरून जनावरांच्या चारा व पाण्याची सोय करण्याची मागणी शेतकरी, नागरिकांकडून होत आहे. परंतु प्रशासन व पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नीरा नदीतील पाणी मागील सात महिन्यांपासून आटल्याने नरसिंहपूर, गिरवी, ओझरे, लुमेवाडी, सराटी आदी बंधारे काहीसे रिकामे तर काही रिकामे पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच नीरा नदीकाठावरील इंदापूर तालुक्यातील सराटी, लुमेवाडी, गोंदी, गिरवी, नरसिंहपूर, निरनिमगाव, चाकाटी तसेच माळशिरस तालुक्यातील संगम, गणेशगाव, बिजवडी, सवतगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज आदि गावातील हजारो एकरावरील उभी असणारी पिकांचे पाण्याअभावी वाळवंटात रूपांतर होण्यास सुरुवात झाली आहे.

तसेच नदी आटल्याने गावांतील विहिरी, बोअर, तलाव कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला व नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे. भीमा नदीवरील नरसिंहपूर, टणू व भाटनिमगाव बंधारे उन्हाळ्याच्या तोंडावर सोलापूरला सोडलेल्या पाण्याने अडवून तुडूंब भरली आहेत.

त्यामुळे नदीवरील इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव व रांजणी गावातील शेकडो एकर शेतातील पिकांना काही दिवसासाठी जीवदान मिळणार आहे.

उन्हाळा कडक असल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन पाणी लवकरच संपण्याची शक्यता आहे. सध्या विजेचा लपंडाव सुरू झाला असून, अनेक विद्युत मोटारी दोन ते तीन तास चालवल्या जात आहेत. त्यामुळे नीरा नदीत पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

विहिरी, कूपनलिकांतील पाणी आटले

इंदापूर तालुक्यातील नीरा व भीमा नद्यांच्या परिसराला पाण्यामुळे बागायती पट्ट्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, परंतु नीरा नदीवरील पाच बंधारे मागील सात महिन्यांपासून कोरडे पडल्याने नदी काठावरील शेतीला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतातील विहिरी व बोअरमधील पाणी आटल्याने ते बंद पडले आहेत. त्यामुळे शेतातील उभी असणारी पिके वाचवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीत नेते दंग आहेत. मात्र नीरा नदीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचा जो ठोस आश्वासन देईल त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मानस शेतकरी राजाने व्यक्त केला आहे. परंतु प्रशासन दिलेला शब्द पाळत नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नासाठी ऐनवेळी कठीण निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- ताजुद्दीन शेख, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT