Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : यंदाचा ऊस गळीत हंगाम लांबला, १५७ कारखान्यांचे धुराडे बंद

Sugarcane Harvesting : महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारांनी गळीत हंगाम बंद केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक विभागांमध्ये उसाचे गाळप संपणार आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Sugar Season : महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारांनी गळीत हंगाम बंद केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक विभागांमध्ये उसाचे गाळप संपणार आहे. महाराष्ट्रातील चालू हंगामात मागील हंगामाच्या तुलनेत ०२ एप्रिलपर्यंत १५७ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे, तर गेल्या हंगामात २०० साखर कारखान्यांनी यावेळी गाळप थांबवले होते.

कोल्हापूर विभागात ०२ एप्रिलपर्यंत ४० पैकी केवळ ३५ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले असून केवळ ५ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. सोलापूर विभागात ५० पैकी ४४ साखर कारखान्यांचे गाळप थांबले असून केवळ ६ साखर कारखाने सुरू आहेत.

या हंगामात महाराष्ट्रात एकूण २०७ साखर कारखाने सुरू होते. त्यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश असून १०५३.३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ०२ एप्रिल २०२४ पर्यंत राज्यात १०७७८९ लाख क्विंटल (१०७.७८) लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे.

गत हंगामात २११ साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता आणि १०५३.०४ लाख टन उसाचे गाळप करून १०५०.८४ लाख क्विंटल (१०५.०८ लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते.

साखर उताऱ्याची टक्केवारी वाढली

राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत एकूण १० कोटी १२ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. दरम्यान, यंदाच्या गळीत हंगामात सरासरी साखर उताऱ्याच्या टक्केवारीत ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात आज अखेरपर्यंतच्या साखर उताऱ्याची टक्केवारी ९.९६ टक्के इतकी होती. यंदाच्या गळीत हंगामातील आजअखेरपर्यंतचा साखर उतारा हा १०.१६ टक्के इतका आहे. यानुसार साखर उताऱ्यात ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT