Mahavikas Aghadi Agrowon
ॲग्रो विशेष

Leader of the Opposition in the Legislative Assembly : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचा वानवा

Maharashtra Assembly Election 2024 : राज्याच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच ऐतिहासिक निवडणूक झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपसह महायुतीला भरघोस मत्ताधिक्य मिळाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. २८८ पैकी २३० जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला (एमव्हीए) केवळ ४६ जागा मिळवता आल्या आहेत. इतरांनी १२ जागांवर विजय मिळवल्या आहेत. तर मविआतील कोणालाही २८ आमदारांच्या विरोधीपक्ष नेत्याचा जादुई आकडा गाठता आलेला नाही. यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार आहे.

राज्यात यंदा महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना रंगला. या वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा पराभव करत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने ८० टक्के जागा जिंकल्या. एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत. तर बहुमतासाठी १४५ आकडा गरजेचा असून फक्त १३ आमदारांच्या साथीने भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते.

पण भाजप आपल्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार आहे. यंदा शिंदेसेनेच्या ५७ जागा आल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ४१ जागा निवडणून आल्या आहेत. तर तीन लहान मित्रपक्षांचे ४ आमदार असून महायुतीचे बलाबल २३४ जागांचे होत आहे.

तर पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव झाला असून यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. महायुतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांच्यासह कोल्हापुरचे नेतृत्व करणाऱ्या सतेज पाटील यांचा वचपा काढला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना आपला पराभव टाळता आलेला नाही.

विरोधी पक्ष नेताही नाही

एकीकडे राज्यात महायुतीचे बलाबल २३४ जागांचे असताना मविआकडे सगळे मिळून ५० देखील आमदार नाहीत. काँग्रेसकडे २०, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे १६ आणि शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले आहेत. या तिनही पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारा २८ आमदारंचा जादूई आकडा गाठता आलेला नाही. यामुळे राज्यात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधकांकडे विरोधीपक्षनेतेपद नसणार आहे.

प्रति मुख्यमंत्रीच पण यंदा नाही

लोकशाहीत जितक्या महत्वाचे मुख्यमंत्री पद आहे तितकेच महत्वाचे विरोधी पक्ष नेतेपद देखील. विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. विरोधी पक्षनेता सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवत सरकारच्या धोरणांवर आसूड ओढण्याचे काम करतो. पण आता विधीमंडळात विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडण्यासाठी विरोधकांकडे संख्या बळच नसल्याने पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीत विधिमंडळात विरोधी पक्षनेता नसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभेचा वचपा आता काढला

यंदा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला रोखत ३१ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपच्या नेतृत्वात महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या होत्या. यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देताना बारकाईने नियोजन केले. तर शनिवारी (ता.२३) निकालानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा वचपा काढल्याचे चित्र स्पष्ट झाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT