Pune News : कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या साखर पट्ट्यात महायुती सरस ठरली असून कोल्हापूर जिल्ह्यात १० च्या १० जागा जिंकल्या आहेत. यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षांना ब्रेक लागला आहे. ऋतूराज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामुळे सतेज पाटील यांच्याकडून ‘गोकुळ’ जाण्याची शक्यता असून महाडिक यांनी गोकुळवर लक्ष केंद्रीत करू असे संकेत दिले आहेत.
यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. पण पाटील यशाचा वारू रोखण्यासाठी महाडिक यांना भाजपने ताकद दिली होती. यासाठी जिल्ह्यात महायुतीने मोठ्या जोडण्या लावल्या. तसे चक्रव्यूह महायुतीने तयार केले. ज्यात सतेज पाटील सापडले आणि मविआचा जिल्ह्यात सुपडा साफ झाला.
यानंतर आता भाजपमधील महाडिक गटाने आपले लक्ष ‘गोकुळ’कडे वळवले आहे. सतेज पाटील यांच्या ताब्यातून गोकुळ काढून घेण्यासाठी महाडिक गटाकडून प्रयत्न केले जातील असे संकेत दिले आहेत. अमल महाडिक विजयी होताच. कोल्हापुरात जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आता लक्ष गोकुळ असे बॅनर हातात गेऊन जल्लोष केल्याने या चर्चांना उधान आले आहे.
पण याआधी देखील गोकुळच्या सर्वसाधारण सभा, विविध निर्णयांवर महाडिक गटाकडून घेतल्या जात असलेल्या कडक भूमिकेतूनच त्याची प्रचिती येत आहे. आता राज्याच्या विधानसभा पार पडल्या असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लागतील.
तशा निवडणुका लागल्यास सर्वात आधी याचा थेट फटका ‘गोकुळ’मधील सतेज पाटील यांच्या सत्तेला बसू शकतो. सध्या गोकुळमध्ये सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे. यात आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक, के. पी. पाटील ही सामिल आहेत.
पण यंदाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात के. पी. पाटील यांना ताकद दिली. आमदार मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंच्या मागे उभे राहिले. यातच झालेल्या लोकसभेत शाहू महाराज यांना निवडणून आणत मंडलिक यांचा रोष ओढावून घेतला आहे.
समिकरणांचा बुमरँग होणार?
गेल्या वेळी जिल्ह्यात महायुतीला रोखण्याचे काम सतेज पाटील यांनी केले होते. त्यांनी स्वत: विधान परिषद लढवताना महादेवराव महाडिक यांचा पराभव केला होता. याची सल आजही महाडिक गटात आहे. यानंतर विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढत २०१९ मध्ये अमल महाडिक यांचा पराभव पुतणे ऋतूराज यांच्याकडून घडवून आणला होता. खासदारकीला 'आमचं ठरलं' म्हणतं संजय मंडलिक यांना साथ देत धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये १० पैकी ६ जागा मविआच्या निवडणुन आणल्या होत्या. यानंतर केडीसीसी, गोकुळ, बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आणली होती.
पण आता सतेज पाटील यांच्याबरोबर असणारेच महायुतीत असल्यानेच सध्या महाडिक यांच्यासाठी जमेची बाजू तयार झाली आहे. यामुळे आगामी काळात महाडिक गटाकडून निश्चितच ‘गोकुळ’ परत मिळवण्यासाठी विविध समीकरणे बांधली जातील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.