Chakan Market Agrowon
ॲग्रो विशेष

Totapuri Mango: कर्नाटकी तोतापुरी आंब्याची चाकणला तीस टन आवक

Chakan APMC: चाकण येथील महात्मा फुले बाजारात रविवारी (ता.२९) येथील कर्नाटक राज्यातून सुमारे तीस टन कर्नाटकी तोतापुरी आंब्याची आवक झाली.

Team Agrowon

Chakan News: चाकण येथील महात्मा फुले बाजारात रविवारी (ता.२९) येथील कर्नाटक राज्यातून सुमारे तीस टन कर्नाटकी तोतापुरी आंब्याची आवक झाली. त्यास मागणी वाढल्याने घाऊक बाजारात प्रतिकिलोला पंचवीस, तर किरकोळ चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव मिळाला.

भुईमुगाच्या शेंगांना प्रतिकिलोस किमान चाळीस ते कमाल पन्नास रुपये बाजारभाव मिळाला. इतर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. त्यास प्रतिकिलोला दहा ते वीस रुपये बाजारभाव मिळाला. उत्पादन खर्चही न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात फेकून दिला. तर एक हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

त्यास प्रतिकिलोला किमान दहा ते कमाल वीस रुपये बाजारभाव मिळाला. इंदोर, आग्रा व गुजरात राज्यातून बटाट्याची १७५० क्विंटलची आवक झाली. इंदोर बटाट्याला प्रतिकिलोस २३ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी,

सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली. चाकण बाजाराच्या आवारात हिरव्या मिरचीची दिल्ली, बुलडाणा व इतर भागातून सुमारे ५० टन आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिकिलोला किमान ३५ ते कमाल ४५ रुपये बाजारभाव मिळाला.रीच्या एका जुडीला ६ ते १० रुपये भाव मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT