Farmers Weekly Market : आठवडे बाजाराचा विस्तार करावा ः मुळीक

Metro City Farmer Market : मागील अकरा वर्षांपासून ती सुरू आहे. त्याचा चांगला फायदा होत असल्याने या आठवडे बाजाराचा विस्तार केला पाहिजे, असे मत भूमाता संस्थेचे अध्यक्ष बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.
Farmers Market
Farmers MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : ग्राहक आणि शेतकरी यांच्या हितासाठी सुरू झालेली आठवडे बाजाराची संकल्पना ही चांगली आहे. मागील अकरा वर्षांपासून ती सुरू आहे. त्याचा चांगला फायदा होत असल्याने या आठवडे बाजाराचा विस्तार केला पाहिजे, असे मत भूमाता संस्थेचे अध्यक्ष बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ शेतकरी प्रोड्युसर कंपनीमार्फत सुरू केलेल्या कोथरूड येथे सुरू आठवडे बाजार बाजाराचा ११ वा वर्धापनदिन रविवारी (ता. २९) रोजी साजरा करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे आयुक्त माधव जगताप, कृषी विभागाचे माजी संचालक दत्तात्रय व्यवहारे, महाएफसीचे अध्यक्ष योगेश थोरात, उपायुक्त गणेश सोनूने, अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मुळक, उद्योगवर्धीनीचे संपादक आनंद अवधाने, चेतन दुधाळ, पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट, श्री स्वामी समर्थ शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे संचालक नरेंद्र पवार, माजी नगरसेवक किरण दगडे, लहू बालवडकर, राजेश माने, गणेश सवाणे, तुषार अग्रवाल, ऋतुराज जाधव आदि उपस्थित होते.

श्री मुळीक म्हणाले, की सध्या आपल्याकडील आठवडे बाजारात बऱ्यापैकी चांगल्या सुविधा दिल्या जात आहे. परंतु अधिक चांगल्या देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जागतिक स्तरावरील शेतमालाच्या बाजारात अनेक चांगल्या सुविधा आहेत.

Farmers Market
Farmers Market : औरंगाबाद येथे शेतकरी आठवडे बाजार सुरु

त्याची प्रत्यक्षात पाहणी करून त्याप्रमाणे आपल्याकडील आठवडे बाजारात या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तर त्याचा ग्राहकांना आणि शेतकरी यांचा चांगल्या पद्धतीने अधिकचा फायदा होऊ शकतो.

Farmers Market
Market Facilities Farmers : शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या

त्यासाठी आपल्या येथील तरूण व सुशिक्षित मुलांनी याकडे वळणे गरजेचे आहे. त्यांनी परदेशात जाऊन विविध बाजाराची माहिती घेतली पाहिजे. पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे आयुक्त माधव जगताप म्हणाले, की महानगरपालिकेच्या माध्यमातून शेतकरी आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करून देत आहे.

या बाजाराच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विषमुक्त भाजीपाला, सेफ्टी स्टँडर्ड पाळून जास्तीत जास्त शेतमालाचा पुरवठा करावा. कार्यक्रमात अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com