Millet Sowing
Millet Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Sowing : खरिपात तृणधान्य पेरणीसाठी आतापासूनच विचार करा

Team Agrowon

Jalna News : येत्या खरिपात पौष्टिक तृणधान्य पेरणीसाठी आतापासूनच विचार करा, असा सल्ला छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिला.

जालना येथील कृषी महोत्सवात (Jalna Agriculture festival) सोमवारी (ता. २७) पौष्टिक तृणधान्य पीक लागवड आणि आहारात वापर या विषयावर डॉ. पवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांचीच लागवड या परिसरात दिसून येत आहे.

एकविध पीक पद्धतीचे धोके वाढत आहेत. किड रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असून उत्पादन खर्च वाढत आहे. यासाठी पीकफेरपालट म्हणून अन्नधान्य पिकाची लागवड येत्या खरिपात शेतकरी बांधवानी करावी.

ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर यासारख्या पौष्टिक तृणधान्य पिकाची काही प्रमाणात का होईना लागवड करावी. खरिपाची परभणीशक्ती हे ज्वारीचे सुधारित वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगरनिर्मित एएचबी १२०० या बाजरी वाणाचेही आहारात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाच्या वाणाची लागवड करावी. बाजरी आणि ज्वारी या पिकाचे महत्त्व देशाच्याच नव्हे तर जगाच्या लक्षात आले आहे.

त्यामुळे या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे महत्त्व लक्षात घेता या पिकाची शेतकऱ्यांनी लागवड करावी, असेही ते म्हणाले.

कृषी विज्ञान केंद्र बदनापूरच्या डॉ. साधना उमरीकर यांनी पौष्टिक तृणधान्यापासून घरगुती प्राथमिक प्रक्रिया करून या पदार्थांचा आहारात समावेश करून निरोगी आरोग्य ठेवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला.

अजय मोहिते यांनी रेशीम शेती का करावी, याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. या वेळी व्यासपीठावर उपविभागीय कृषी अधिकारी परतूर राम रोडगे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे उपस्थित होते.

तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद नसल्यातच जमा

जालना कृषी महोत्सवाला उद्‍घाटनाच्या दिवशी लोकांची बऱ्यापैकी असलेली उपस्थिती दुसऱ्याच दिवशी अत्यल्प उपस्थितीवर आली.

मंगळवारी (ता. २८) तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत महोत्सव स्थळी शेतकऱ्यांची नगण्य उपस्थिती होती. तर चर्चासत्राकडे कुणी फिरकत नसल्याचे चित्र होते. उरलेल्या दोन दिवसांत महोत्सवाला प्रतिसाद मिळतो की नाही हा प्रश्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT