Jalna Agriculture Festival : जालना येथे उद्यापासून कृषी महोत्सव

कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्त्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.
Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon

Jalna News : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील भोकरदन नाका ते मोंढा रोड येथील गोरक्षण समितीच्या पांजरपोळ मैदानावर जालना जिल्हा कृषी महोत्सव (District Agriculture festival) २३ ते २७ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती असेल याशिवाय विविध मतदार संघाचे आमदार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, आत्माची कृषी संचालक दशरथ तांभाळे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

Agricultural Festival
Agriculture Festival : शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्षांनी एकजूट दाखवावी

कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे या या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्त्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.

कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रासह यथोचित सन्मान करून स्मृतीचिन्ह वितरण करण्यात येतील.

Agricultural Festival
Agriculture Festival : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महोत्सव

जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवात शासकीय दालनामध्ये ४० स्टॉल्स, कृषी निविष्ठा ३०, कृषी तंत्रज्ञान व सिंचन ३०, गृहोपयोगी वस्तू ४०, धान्य महोत्सव २०, खाद्यपदार्थ २० अशा एकूण अंदाजे २०० पेक्षा जास्त स्टॉलचा समावेश असेल.

शासकीय दालनामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती व उपक्रम यांचे स्टॅाल्स असतील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आत्मा नियामक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जालना डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com