Hingoli Agriculture Festival : हिंगोली जिल्हा कृषी महाेत्सावास आजपासून प्रारंभ

आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया उत्पादनांची दालने असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
 Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon

Hingoli News : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (Agricultural Technology Management) (आत्मा) यांच्यातर्फे चार दिवशीय जिल्हा कृषी महोत्सव (Agriculture Festival) शनिवार (ता. २५) ते मंगळवार (ता. २८) कालावधीत हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

शनिवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घघाटन होणार आहे.

या कृषी प्रदर्शनात पीक लागवड तंत्रज्ञान,काढणी,प्रक्रिया यावरील चर्चासत्र, शेतकरी सन्मान,धान्य महोत्सव, विक्रेता - खरेदीदार संमेलन होणार आहे.

आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया उत्पादनांची दालने असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

 Agricultural Festival
Agriculture Festival : राशिवडेत रविवार पासून जिल्हा कृषी महोत्सव

उद्घघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार तथा बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील राहतील.

आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, आमदार प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक रविशंकर चलवदे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, गोविंद बंटेवाड आदींची उपस्थिती राहणार आहे.

कृषी प्रदर्शनातील चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, कडधान्य, ज्वारी पीक आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन, तृणधान्याचे नवीन वाण, प्रक्रिया उद्योग, चारा प्रक्रिया, कांदा बिजोत्पादन, हळद पीक लागवड, पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, प्रक्रिया, विपणन, मूल्यवर्धन, यांत्रिकीकरण, हळद शेतकरी उत्पादक शेतकरी यशकथा, करवंद, ड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान, फळ प्रक्रिया, सेंद्रिय, नैसर्गिक शेती, शेती माल खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आदी विषयावर कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी माहिती देणार आहेत.

कृषी महोत्सवाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com