Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटे यांना अभय मिळाल्याची चर्चा

Maharashtra Politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र भेट झाल्यानंतरही नेमका काय निर्णय घेतला याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र भेट झाल्यानंतरही नेमका काय निर्णय घेतला याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीआधी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार आणि कोकाटे यांची २० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर प्री कॅबिनेट आणि मंत्रिमंडळ बैठकीला कोकाटे उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांना टाळत ते मंत्रालयातून बाहेर पडले.

सायंकाळी पक्ष कार्यालयात आलेल्या कोकाटे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना लांब ठेवत बोलणे टाळले. कृषिमंत्री कोकाटे यांचा विधान परिषदेतील रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी गेलल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधातील आंदोलन पेटले होते. याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले होते.

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारात मंत्रालयातील पवार यांच्या दालनात कोकाटे यांनी भेट घेतली. या वेळी पवार यांनी कोकाटे यांना कडक शब्दांत समज दिली. तसेच यापुढे एकही संधी मिळणार नाही, असेही सांगितल्याचे समजते. कोकाटे यांच्यावर त्यांच्या खात्याबाबत आरोप नाहीत. त्यांचे वर्तन चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना एक संधी देऊ, अशी चर्चा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत झाल्याचेही समजण्यता येते.

अभय मिळाले, पण मौन

कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी निर्णय घेऊ असे सांगण्यात आले होते. मात्र काय निर्णय घेतला याबाबत मात्र अधीकृतरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री कोकाटे यांच्याकडून सांगण्यात आले नाही. सायंकाळी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात एका पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी कोकाटे उपस्थित होते. या वेळीही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असतान त्यास नकार दिला. बराच वेळ ते अजित पवार यांच्या दालनात बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटत होते. या वेळी अजित पवार कार्यालयात नव्हते.

पक्षांतर्गत विरोधकांत निराशा

कृषिमंत्री कोकाटे स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळे त्यांनी अनेकांना दुखावले आहे. परिणामी, त्यांच्याबाबत काय निर्णय होतो याकडे पक्षांतर्गत विरोधकांचे लक्ष होते. कोकाटे यांचा पत्ता कट होण्याच्या निर्णयाची वाट पाहत असलेल्या विरोधकांची निराशा लपून राहिली नाही.

कोकाटे यांना कडक समज

कोकाटे माध्यमांशी बोलताना बेछूट बोलतात. त्यांना बोलण्याचे भान नाही, असा आरोप करण्यात येतो. त्यामुळे यापुढे माध्यमांशी बोलायचे नाही, यापुढे कोणतीही चूक मागे टाकली जाणार नाही, अशी कडक समज अजित पवार यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, विधिमंडळात कामकाज सुरू असताना रमीचा गेम खेळतात आणि सरकार बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही. कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजय वडेट्टीवार, काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT