Chana Procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Procurement In Buldana : बुलढाण्यात हरभरा खरेदी सुरू होणार की नाही संभ्रम कायम

बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेली नाफेडची हरभरा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने गेल्या आठवडाभरापासून बंद आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेली नाफेडची हरभरा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने गेल्या आठवडाभरापासून बंद आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

शेतकऱ्यांकडे मोजणी अभावी हरभराकडून असल्याने तो आता कमी दराने बाजार समित्यांमध्ये किंवा व्यापाऱ्याला विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दुसरीकडे या प्रकाराबाबत अद्याप कुठलाही तोडगा शासन स्तरावरून काढण्यात न आल्याने खरेदी प्रक्रिया सुरू होणार किंवा नाही याबाबतचा संभ्रम कायम आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडने जिल्ह्यात १५ मार्चपासून हरभरा खरेदीला सुरुवात केली होती. ज्या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशांना एसएमएस पाठवून माल खरेदी केंद्रांवर बोलवण्यात आला.

जेमतेम एक महिनाही पूर्ण होत नाही तोच सुमारे साडेसहा लाख क्विंटल खरेदी झाल्याने जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा हवाला देत नाफेडने जिल्ह्यातील उर्वरित खरेदी प्रक्रिया बंद केली. यावेळी पहिल्यांदाच हरभरा खरेदीचे जिल्हानिहाय उद्दिष्ट वाटप करण्यात आलेले आहेत.

राज्याला ८० लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट केंद्राकडून आल्याचे सांगितले जाते. हे उद्दिष्ट जिल्हानिहाय त्या-त्या जिल्ह्यातील लागवड क्षेत्र, पिकाची उत्पादकता गृहीत धरून वाटप करण्यात आले आहे.

संबंधित जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या एकूण हरभऱ्याच्या २५ टक्के माल नाफेडने खरेदी करण्याचे धोरण आपल्याचेही सांगितले जाते. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील उद्दिष्ट पूर्ती झाल्यामुळे आता नवीन खरेदी सुरू करण्यासाठी उद्दिष्ट वाढवण्याची आवश्यकता आहे.

या अनुषंगाने शासनाकडे जिल्ह्याचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी झालेली आहे. मात्र त्याबाबत कुठलाही निर्णय आलेला नसल्याने खरेदी बंद आहे.

जिल्ह्यातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झालेला नाही. जर नाफेडने खरेदी केलीच नाही तर हा राहिलेला हरभरा शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये किंवा व्यापाऱ्याला विकण्याशिवाय पर्याय नाही.

खरेदीचा निर्णय तातडीने होण्याची मागणी

खुल्या बाजारात आज हरभऱ्याचा दर अवघा ४००० सुरू आहे तर शासनाचा हमीदर हा ५३३५ रुपये असल्याने खुला बाजार व हमीदर यात सुमारे एक हजार रुपयांची तफावत दिसून येते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उर्वरित हरभरा खरेदीचा निर्णय तातडीने होण्याची मागणी या जिल्ह्यातील उत्पादकांमधून केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT