Chana Market : हरभरा बाजार दबावातच का आहे? भाव वाढतील का?

Chana Rate : हरभरा बाजार सध्या दबावातच आहे. हंगामाच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक बाजारांमध्ये हरभरा दरात काहीशी सुधारणा दिसली होती.
Chana Market
Chana Market Agrowon
Published on
Updated on

Chana Rate Update : हरभरा बाजार सध्या दबावातच आहे. हंगामाच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक बाजारांमध्ये हरभरा दरात (Chana Rate) काहीशी सुधारणा दिसली होती. पण नंतरच्या टप्प्यात हरभरा दर पुन्हा नरमले. मग तुम्ही म्हणाल, यंदा हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं.

तुरीच्या उत्पादनातही मोठी घट झाली, त्यामुळं हरभरा दरात सुधारणा होण्याची शक्यता होती. पण नाफेडकडील हरभऱ्याचा स्टाॅक आणि सरकारचं धोरण यामुळं दर दबावात आहेत.

देशातील महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये पाऊस आणि गारपीट झाल्यानं पिकाला मोठा फटका बसला. उत्पादनातील घट वाढल्याचाही अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळं हरभरा दरात क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसली होती.

हरभरा दरात आणखी वाढ होईल, अशी शक्यता असतानाच सरकारनं कडधान्य बाजाराकड आपला मोर्चा वळवला. मागील काही दिवसांपासून देशात तूर, मूग आणि उडदाचे दर तेजीत आहेत. पण हरभरा स्वस्त असल्यानं सरकारला हायसं वाटतं.

Chana Market
Chana Procurement In Jalna : जालन्यात ९९ हजार २५४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

हरभरा दरात सुधारणा झाल्यानंतर सरकारनं तुरीबरोबरच हरभऱ्याच्या साठ्याचीही चाचपणी सुरु केली. त्यामुळं हरभरा व्यापारी आणि स्टाॅकिस्टही हात आखडूनच काम करत आहेत. सरकारला काहीही करून डाळींचे भाव कमी ठेवायचे आहेत.

पुढील काळात लोकसभेसही विधानसभेच्या निवडणुका आहेत. यामुळं डाळीचे भाव जास्त ठेऊन सरकारला ग्राहकांची नाराजी घ्यायची नाही. याठीच सरकारचा हा खटोटोप सुरु आहे. पण यामुळं हरभरा दरावर दबाव आला.

नाफेडची खरेदी सुरु असल्यानं बाजार टिकून आहे. नाफेडनं आतापर्यंत ७ लाख ७६ हजार टन हरभऱ्याची खेरदी केली. त्यापैकी ४ लाख ५४ हजार टन खरेदी महाराष्ट्रात झाली. तर गुजरामध्ये २ लाख २१ हजार टन हरभरा खरेदी केला.

तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात १ लाख १७ हजार टनांची खरेदी झाली. नाफेडला हरभरा देण्यासाठी शेतकरी माल मागं ठेवत आहे. नाफेडनं ८ लाख टन हरभरा खरेदीची मुदत ठेवली होती. मग हे उद्दीष्ट पूर्ण झाल्यानंतर नाफेड काय करते हेही पाहण महत्वाचं आहे.

नाफेडकडील साठ्याचाही बाजारावर परिणाम दिसतो. कारण मागील हंगामात नाफेडने मोठ्या प्रमाणात खेरदी केला होता. पण नंतरच्या काळात हा साठा बाजारात आणला. त्यामुळं दर दबावातच राहीले.

Chana Market
Chana Procurement : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ २००० क्विंटल हरभऱ्याची खरेदी

वर्षभर हरभऱ्याने खुल्या बाजारात हमीभावाचा टप्पाही गाठला नव्हता. सध्या नाफेडकडे मागील हंगामातील १४ लाख टनांच्या दरम्यान हरभरा असल्याचं सांगितलं जातं. तर यंदाची खरेदी ८ किंवा ९ लाख टन पकडली तरी मोठा साठा होणार आहे.

म्हणजेच यंदाही नाफेडच सर्वात मोठा स्टाॅकिस्ट असेल. तसचं नाफेड पुढील काळात हा माल बाहेर काढेल. त्यामुळं व्यापारी आणि स्टाॅकिस्ट वेट अॅन्ड वाॅचची भुमिका घेत आहेत.

सध्या नाफेडच्या खेरदीमुळे बाजारात दर टिकून आहेत. सध्या हरभऱ्याला ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळतोय. तर यंदा सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. म्हणजेच खुल्या बाजारातील भाव ५०० ते ८०० रुपयाने कमी आहेत.

नाफेडची खरेदी सुरु आहे तोपर्यंत या भावात १०० ते २०० रुपयांचे चढ उतार येऊ शकतात. तर नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर दरावर काही काळ दबाव येऊ शकतो. पण पुढील काळात देशातील पाऊसमान, नाफेडची विक्री आणि सरकारचे धोरण यावर बाजार अवलंबून असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com