Eknath shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : ओठात एक पोटात एक, अशी भूमिका नाही : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊन दिलेला शब्द सरकार पाळणार, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. १७) जाहीर केली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार नाही, आम्ही जे बोलतो ते करतो. ओठात एक पोटात एक, अशी भूमिका नाही. कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊन दिलेला शब्द सरकार पाळणार, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. १७) जाहीर केली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानात ध्वजवंदन समारंभ पार पडला. त्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘‘सगे-सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत काही आक्षेप आले होते. शासनाने न्या. शिंदे यांची कमिटी स्थापन केली आहे. त्यावर काम सुरू आहे.

सध्या कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे, हे सर्वांत मोठे यश आहे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता दहा टक्के आरक्षण सरकारने दिले. त्याच्या विरोधात आज कोण न्यायालयात गेला ते पाहा.

आतापर्यंत ५ हजार मराठा मुलांना नोकरी दिली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळातून एक लाख जणांना बिनव्याजी कर्ज देऊन रोजगार निर्माण केला. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत, पण त्यांनी आता सहकार्य करावे. आरक्षण देण्याची मोठी संधी असतानाही, त्यांनी ते आरक्षण दिले नाही त्यांना जाब विचारा, असे श्री. शिंदे म्हणाले.

महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठलाही संघर्ष नाही. सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत समन्वयाने बोलणी सुरू आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

Turmeric Price Issues: हळद दरप्रश्नी कायमस्वरूपी उपायोजनांसाठी बैठक घ्यावी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा १०० कोटी ४५ लाख २० हजार रुपये विमा परतावा देय

Spice Crops Farming: तीन तालुक्यांत मसाला पिकांवर भर

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT