Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : तीनही जिल्ह्यांत पावसात जोर नाहीच

Rain Forecast : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांत पावसात जोर नसल्याचीच स्थिती आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांत पावसात जोर नसल्याचीच स्थिती आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तीनही जिल्ह्यातील मोजक्याच ठिकाणी तुरळक, हलका पाऊस झाला. अनेक ठिकाणचा पाऊस दखलपात्रही नव्हता.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ४५ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. वैजापूर तालुक्यातील चिकलठाण मंडलात झालेला २५.८ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक राहिला.

जिल्ह्यातील उस्मानपुरा मंडलात ७.३ मिलिमीटर, चिकलठाणा ७.८, अजिंठा ७.५, वडोदबाजार येथे ५ मिलिमीटर झालेला पाऊस वगळता इतरत्र पावसाची हजेरी तुरळक स्वरूपाचीच होती. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २३ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. राजूर मंडलात ५.३ मिलिमीटर, केदारखेडा ५.३, कुंभारझरी ११.५, रामनगर ६.५, बावणे पांगरी ५.३, ढोकसाळ ९.३ पांगरी येथे ८.५ मिलिमीटर झालेला पाऊस वगळता इतरत्र पावसाची हजेरी तुरळक स्वरूपाची होती.

बीड जिल्ह्यातील ७७ पैकी केवळ १५ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील नांदूरघाट मंडलात ७.५ मिलिमीटर झालेला पाऊस सर्वाधिक राहिला. इतर मंडलांतील पावसाचे हजेरी अगदीच नगण्य होती.

पावसात जोर नसल्याने मराठवाड्यातील प्रकल्पांमध्येही अपेक्षेइतका पाणीसाठा होत नसल्याची स्थिती आहे. अर्धाअधिक पावसाळा उलटून गेला असतानाही असलेली ही स्थिती पाणीसाठ्याबाबतीत चिंता वाढवणारी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT