Pune News : मागील आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात पुढील पाच दिवस पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर आज राज्यातील काही भागात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशस्त्र विभागाने वर्तवली आहे. तर उन्हाचा चटकाही काहसा वाढला आहे.
राज्यात आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
तर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत बहुतांश भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी मात्र मराठवाड्यातील नांदेड, लातूर. धाराशिव, तसेच मध्यमहाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका काहीसा जाणवू लागला आहे. शेती कामांनाही वेग आला आहे. बहुतांश भागात खुरपणी फवारणीची कामे शेतकरी करत आहेत. मागील आठवडाभर राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली होती.
तर काही भागात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. परंतु आता पावसानं उघडीप दिल्यानं शेती कामांना वेग आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.