Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : नगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने पेरा कमी

Nagar Rain Update : नगर जिल्ह्यात यंदा लवकर पेरण्याला सुरुवात झाली असली तरी अजूनही पुरेसा पाऊस नसलेला भागात पेरणीक्षेत्र कमीच आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा लवकर पेरण्याला सुरुवात झाली असली तरी अजूनही पुरेसा पाऊस नसलेला भागात पेरणीक्षेत्र कमीच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली असून, चार तालुक्यांत पेरणी क्षेत्र सरासरीपेक्षा कमी आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात एकूण सरासरीएवढी पेरणी झाली आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख १ हजार ४७४ सरासरी क्षेत्र आहे. गेल्या तीन वर्षांतील खरीप पेरणी स्थिती पाहता यंदा ७ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी, कापूस लागवड होण्याचा कृषी विभागाने अंदाज गृहीत धरून बियाणे, खताची मागणी केली होती. मागील वर्षी पावसाने बराच ताण देऊनही ५ लाख ८६ हजार ३५८ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली होती.

यंदा दर वर्षीच्या तुलनेत पावसाचे लवकर आगमन झाले आहे. शिवाय चांगला पाऊस झाल्याने कापूस लागवड, पेरणीला लवकर सुरुवात झाली आहे. लवकर पाऊस झाला, तर मूग आणि उडदाचे क्षेत्र तुलनेने अधिक होते असा आतापर्यंतचा अनुभव आहे.

त्यामुळे यंदा पावसाची अशीच स्थिती राहिली, तर पेरणी, कापूस लागवड चांगली होईल असा अंदाज होता, पण त्यातुलनेत उडीद, मुगाची पेरणी झाली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली एकूण पेरणी सरासरीच्या एवढी असली तरी श्रीगोंदा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहाता या तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली आहे. आठ तालुक्यांत सरासरीएवढी पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी (कंसात टक्केवारी हेक्टरमध्ये)

नगर ः ४६,३५६ (१२२), पारनेर ः ५९,०४२ (११७), श्रीगोंदा ः २६,६१३ (९७), कर्जत ः ६२,६३२ (११९), जामखेड ः ५३,९६८ (११०), शेवगाव ः ५५,९२२ (११०), पाथर्डी ः ६०,१६० (१००), नेवासा ः ४६,९८९ (१०४), राहुरी ः २६,६६५ (९५), संगमनेर ः ३३३०७ (६५), अकोले ः २६८५६ (७४), कोपरगाव ः २९०६५ (७३), श्रीरामपूर ः २४,७२८ (१०५),

पीकनिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)

भात ः ४२१०, बाजरी ः ६८२६५, नाचणी ः ३, मका ः ६१,०५६, तूर ः ६२,४१०, मुग ः ४८,०४३, उडीद ः ५६,१११, भुईमूग ः ३३९०, कारळे ः ७५, सूर्यफूल ः १३४, सोयाबीन ः १,४२,२५०, कापूस ः १,२९,५५७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT