Kharif Sowing : उडदाची जवळपास दीड पट पेरणी

Agriculture Sowing Update : बीड जिल्ह्यात मृगाचा पाऊस चांगला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीत उडदाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १४२ टक्के पेरणी केली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यात मृगाचा पाऊस चांगला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीत उडदाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १४२ टक्के पेरणी केली आहे. दुसरीकडे मुगाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ४८ टक्केच पेरणी झाली आहे.

यंदा जिल्ह्यात उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८३८ हेक्टर निश्‍चित करण्यात आले आहे. १० जुलै अखेरपर्यंत या क्षेत्राच्या तुलनेत ४१ हजार ५३ हेक्टर म्हणजे जवळपास १४२ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

तालुकानिहाय विचार करता बीड तालुक्यात उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र ३५६८ हेक्टर असताना प्रत्यक्षात २६३७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पाटोदा तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र ४०४२ हेक्टर असताना ४ हजार २० हेक्टर क्षेत्रावर उडीद पेरला गेला आहे. आष्टी तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ६१८ हेक्टर असताना ३० हजार ४२७ हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Agriculture Sowing : पालघरमध्ये ९८ टक्के पेरण्या

शिरूर कासार तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र ७९४ हेक्टर असताना २९२१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. माजलगाव तालुक्यात सर्वसाधारण १८९ क्षेत्र असताना फक्त १७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेवराई तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र १८ हेक्टर असताना २२२ हेक्टर क्षेत्रावर उडदाची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.

धारूर तालुक्यात १५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असताना प्रत्यक्षात १३९ हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली आहे. वडवणी तालुक्यात सर्व साधारण क्षेत्र ९० हेक्टर असताना प्रत्यक्षात २८ हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र २९२ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७१ हेक्टर क्षेत्रावरच उडदाची पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Khandesh Sowing : खानदेशात ९१ टक्के पेरण्या पूर्ण

केज तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र ९५१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५६९ हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली आहे. परळी तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र १२३ हेक्टर असताना प्रत्यक्ष २ हेक्टर क्षेत्रावरच उडदाची पेरणी झाली आहे. मुगाची ४८ टक्के पेरणी मुगाचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र २१ हजार ८७६ हेक्टर असताना प्रत्यक्षात १० हजार ४२१ हेक्टर म्हणजे केवळ ४८ टक्के मुगाची पेरणी झाली आहे.

त्यामध्ये बीड तालुक्यातील २१०९ हेक्टर, पाटोदा १२२८ हेक्टर, आष्टी १०८१२ हेक्टर, शिरूर कासार ११३२ हेक्टर, माजलगाव २१२ हेक्टर, गेवराई १७४३ हेक्टर, धारूर २४१ हेक्टर, वडवणी ९३ हेक्टर, अंबाजोगाई ३९३ हेक्टर, ६४६ हेक्टर, परळी ९१२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

तालुकानिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका सर्वसाधारण प्रत्यक्ष

बीड ११९९७५ ११४७५६

पाटोदा ५६८६५ ५०२७६

आष्टी ९३००८ ८३२१९

शिरूर कासार ५०७२९ ४७४८७

माजलगाव ६८७१३ ६०३३२

गेवराई १०६३६७ १०२१५४

धारूर ४११८२ ४२०२९

वडवणी २९९९५ २६५४६

अंबाजोगाई ६९५२० ७०३७८

केज ९२१८२ ९१५८९

परळी ५७२५० ६०७७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com