Kharif Sowing : दमदार पावसामुळे खरीप पेरा ८२ टक्क्यांपर्यंत

Rain Update : राज्यातील दमदार पावसामुळे खरिपाचा पेरा ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रोपवाटिका तयार असलेल्या भात उत्पादक पट्ट्यांमध्ये आता भाताच्या रोपांची पुनर्लागवडी वेगाने पुढे जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील दमदार पावसामुळे खरिपाचा पेरा ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रोपवाटिका तयार असलेल्या भात उत्पादक पट्ट्यांमध्ये आता भाताच्या रोपांची पुनर्लागवडी वेगाने पुढे जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

२०१६ ते २०२१ या पाच वर्षांतील खरीप पेरा बघता राज्यात सरासरी १४२ लाख हेक्टरवर खरीप पिके घेतली जातात. खरिपात गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ४०.६ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र चांगल्या पावसामुळे ११६ लाख हेक्टरच्या पुढे (८२ टक्के) पेरा झालेला आहे. भाताचे सरासरी लागवड क्षेत्र १५ लाख हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत पेरा ३ लाख हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : पुणे विभागात ९६ टक्के पेरण्या

मुख्य पिकांमध्ये मक्याचा पेरा ८.९५ लाख हेक्टरवर, तूर १०.५४ लाख हेक्टर, कापूस ३७.६८ लाख हेक्टर तर सोयाबीनचा पेरा ४४.८७ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. यंदा तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे तेलबिया पिकाचे सरासरी क्षेत्र ४३.९२ लाख हेक्टर आहे. परंतु यंदा आतापर्यंत पेरा ४६ लाख हेक्टरच्या पुढे झाला आहे.

राज्यात मॉन्सूनची वाटचाल अपेक्षेप्रमाणे चांगली होते आहे. गेल्या खरिपात जून महिन्यात राज्यात फक्त ५४ टक्के पाऊस झाला होता. यंदा तो २२१ टक्के झाला आहे. जुलैत राज्यात सरासरी ३३१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. गेल्या जुलैत ४५९ मिलिमीटर पाऊस झाला होता. चालू जुलैत केवळ ९ दिवसांत ११४ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. १ जून ते ८ जुलैपर्यंतची मॉन्सूनची प्रगती पाहिल्यास राज्याच्या २१७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे.

Kharif Sowing
Agriculture Sowing : अकोल्यातील रखडलेल्या पेरण्यांना वेग

७५ ते १०० टक्के पाऊस ८५ तालुक्यांमध्ये; तर ५० ते ७५ टक्के पाऊस ४६ तालुक्यांमध्ये झालेला आहे. मात्र चार तालुक्यांमध्ये अजूनही अल्प म्हणजे केवळ २५ ते ५० टक्के पाऊस झालेला आहे. पावसाची वाटचाल पाहून शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेतील सहभागदेखील वेगाने वाढवला आहे. आतापर्यंत ८४.६३ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यामुळे ५४.०९ लाख हेक्टरवरील खरीप पिके विमा संरक्षित झालेली आहेत.

राज्यात मॉन्सून चांगली साथ देत असल्यामुळे खरीप पेरा यंदा समाधानकारक होतो आहे. यंदा मका, मूग, उडीद, तीळ, काऱ्हाळ व सूर्यफुलाचा पेरा विक्रमी होण्याची शक्यता आहे.
विनयकुमार आवटे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग.

खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती (१० जुलैअखेर)

पीक- सरासरी क्षेत्र- - गेल्या वर्षीचा पेरा--चालू वर्षाचा पेरा (टक्का)
धान १५,०८,३७४----१०,६,५१९-----३,०७,१६४ (२०)
खरीप ज्वारी २,८८,६१५----२२,३०६-----७७,९४९ (२७)
बाजरी ६,६९,०८९----३४,१३८-----३,३९,७८६ (५१)
नाचणी ७८,१४९---१,८७२-----१३,१८४ (१७)
मका ८,८५,६०८----१,८६,४१७-----८,९५,७३७ (१०१)
तूर १२,९५,५१६---३,३५,१७०-----१०,५४,४०६ (८१)
मूग ३,९३,९५७----२५,५३२-----२,०१,८८५ (५१)
उडीद ३,७०,२५२---२०,३८१-----३,०५,०६९ (१८)
भुईमूग १,९१,५७५----३२,३९४----१,१७,६१८ (६१)
तीळ १५,१६२--------५९४-----६,५१६ (४३)
काऱ्हाळ १२,४६०------३०६----१,११७(९)
सूर्यफूल १३,७८०-----४१-----७,१४८(५२)
सोयबीन ४१,४९,९१२–११,०६,९३०–४४,८७,८४४ (१०८)
कापूस ४२,०१,१२८–२१,८९,०८७–६७,६८,२१४ (९०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com