Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue : पाणी घटल्याने ‘उजनी’वरील योजना बंद पडण्याची शक्यता

Water Supply Scheme Update : एकीकडे पाण्याचा हा उपसा आणि दुसरीकडे घटत चाललेली पाणी पातळी यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Solapur News : एकीकडे पाण्याचा हा उपसा आणि दुसरीकडे घटत चाललेली पाणी पातळी यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता आहे. सोलापूरसह नगर, पुणे, धाराशिव या जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ४४ टक्क्यांवर पोचला आहे. वरचेवर त्यात घटच होत आहे. त्यात आता येत्या १० मेपासून सोलापूरसाठी उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाणार आहे.

त्यावेळी साधारणतः: पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. हे आवर्तन सोडल्यावर धरण उणे ५५ टक्के होईल. मागील सहा महिन्यांत धरण रिकामे झाले आहे. सध्या जिल्हाभर दुष्काळाची दाहकता वाढत असून उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सव्वाशेहून अधिक टॅंकर सुरू झाले आहत. त्यातच धरणावर अवलंबून असणाऱ्या सोलापूर, पंढरपूर या मोठ्या शहरांसह सुमारे १२५ गावांच्या पाणी योजनांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्याशिवाय श्री सिद्धटेक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक, कर्जत, धनस्मृती टेक्स्टाईल प्रा.लि. झरे, नेचर डिलाईट प्रा.लि. कळस, भैरवनाथ शुगर प्रा.लि. आलेगाव, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, वनगळी, रे नगर फेडरेशन कुंभारी, हरनेश्वर ॲग्रो लि. कळस (ता. इंदापूर), बारामती ॲग्रो लि. पिंपळी, अंबालिका शुगर वर्क्स प्रा. लि. अंबालिका नगर, कर्जत, भैरवनाथ शुगर वर्क्स, विहाळ युनिट-दोन, श्री मकाई साखर कारखाना, भिलारवाडी, युटोपीयन शुगर लि. यांच्याही पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून, अन्य काहींचा पाणीपुरवठा लवकरच बंद पडेल, अशी सद्य:स्थिती आहे.

गावांच्या योजनाही बंदच्या मार्गावर

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना उजनीवरून आहेत. आता धरणाने तळ गाठल्याने अनेक गावांच्या योजना बंद पडल्या आहेत. दरम्यान, त्या योजनांमध्ये व्होळे व २७ गावे, कव्हे व १० गावे, जेऊर व २९ गावे, राशीन, अखोणी व २२ गावे, जिंती, केत्तूर नं.२, सावडी कोर्टी व भिगवण, शिरसोडी व २ गावे, गागरगाव, देऊळगाव राजे, देवळाली, नीरा नरसिंहपूर, पिंपळखुटे, कुर्डू गाव, अंबड (ता. माढा) या योजनांचाही त्यात समावेश आहे,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT