Ujani Dam
Ujani DamAgrowon

Ujani Dam : ‘उजनी’च्या पाण्याबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

Department of Water Resources : जलसंपदा विभागाने नलिका वितरण प्रणाली धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंचन योजनेतील बचत झालेले शिल्लक पाणी लाभक्षेत्राबाहेर देण्यास नवीन परिपत्रकात मान्यता देण्यात आली आहे.

Modnimb News : जलसंपदा विभागाने नलिका वितरण प्रणाली धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंचन योजनेतील बचत झालेले शिल्लक पाणी लाभक्षेत्राबाहेर देण्यास नवीन परिपत्रकात मान्यता देण्यात आली आहे. या सुधारित निर्णयामुळे माढा तालुक्यातील बावी, तुळशी, पिंपळखुंटे, परितेवाडी, कुर्डू या गावांना सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

सीना माढा योजनेतील वितरण व्यवस्था बंद नलिकेद्वारे केल्याने बरेचसे पाणी वाचत आहे. हे वाचलेले पाणी या गावांना मिळण्याबाबतची मागणी गेली अनेक वर्षे होत होती. या गावातील नागरिकांनी याबाबत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक शेतकरी विधान भवनासमोर उपोषणाला बसले होते.

Ujani Dam
Minimum Support Price : हमीभावाबरोबरच हवी खरेदीची हमी

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधिमंडळाच्या पटलावरही हा विषय चर्चेला आणला होता. खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. सिंचन योजनांच्या लाभक्षेत्राबाहेरील पाण्याची निकड लक्षात घेऊन सुधारणा करण्यासाठी जलसंपदा विभागाने एक समितीही नेमली. त्या समिती ने त्यांचा अहवाल जलसंपदा कार्यालयाला सादर केला.

पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक वर्षे आम्ही लढा दिला. याप्रसंगी रक्तानेही पत्रे लिहिली. याला यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. सीना माढा योजनेत या गावांचा समावेश करून कामासाठी आर्थिक तरतूद केली जावी.
सूरज मोरे, पाणी संघर्ष समिती, बावी
Ujani Dam
Jowar Production : खानदेशात दादर ज्वारीचे एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन
सीना माढा योजनेत या गावांच्या समावेशासाठी आमदार बबनराव शिंदे यांच्यामार्फत आम्ही प्रयत्नशील होतो. जलजीवन मिशनचे काम पूर्ण होत आले आहे. परंतु पाण्याचा स्रोत नसल्याने ही योजना बंद पडण्याची शक्यता होती. यासाठी सीना-माढा योजनेचे पाणी मिळण्याबाबत आम्ही आशावादी आहोत.
डॉ. शरद मोरे, सरपंच, तुळशी, ता. माढा.
अतिरिक्त पाणी मिळण्याबाबतचा शासन आदेश आल्याने पाणी मिळण्यासाठी आशा वाढल्या आहेत. यासाठी नागपूरमध्ये शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. त्याची ही फलश्रुती म्हणता येईल. येणाऱ्या काळात कुर्डूसह अन्य गावांना पाणी मिळण्यासाठी मंजुरी आणि निधीची करून शासनाने लवकरात लवकर या गावांना पाणी द्यावे.
संदीप पाटील, माजी उपसरपंच, कुर्डू, ता. माढा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com