Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market News : कांद्याचे दर वाढल्याने २५ कांदा पिशव्यांची चोरी

Onion Theft : कांद्याच्या दरात वाढ होऊ लागल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पारगाव येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला एकूण २५ पिशव्या कांदा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (ता. २८) घडली.

Team Agrowon

Pune News : कांद्याच्या दरात वाढ होऊ लागल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पारगाव येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला एकूण २५ पिशव्या कांदा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (ता. २८) घडली.

येथील ढोबळे मळा येथे शनिवारी (ता.२८) रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगावच्या ढोबळे मळा येथे शेतकरी खंडू सादू ढोबळे यांच्या घराजवळ बराकीत कांदा साठवून ठेवलेल्या कांद्याची निवड करून बाजारात विक्रीला पाठविण्यासाठी त्यांनी १० पिशव्या कांदा भरून ठेवला होता.

हा कांदा मंचर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवणार होते. परंतु रात्रीच्या वेळी चोरट्यांनी बराकीतील १० पिशव्या चोरून नेल्या, त्यामुळे सुमारे २५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

तर, याच मळ्यातील दुसऱ्या घटनेमध्ये शेतकरी अजित बाबाजी ढोबळे यांनी बराकीतील कांद्याची निवडून विक्रीला पाठविण्यासाठी १५ पिशव्या बराकीत भरून ठेवल्या होत्या.

रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी या पिशव्या लंपास केल्या. यामुळे शेतकऱ्यांचे ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. पारगाव पोलिस ठाण्यात या दोन शेतकऱ्यांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास पारगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT