Share Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Stock Market : शेअर मार्केटची झिंग

संजीव चांदोरकर

संजीव चांदोरकर

Share Market : ‘अ रे, जरा दमाने चढ’ असे लोकांनी सांगून देखील दारू पिऊन झिंगलेला एक इसम झपाझप झपाझप एका उंच कड्यावर चढतच राहिला होता. त्याचे समर्थक / पाठीराखे ‘बघा, तो अजून नाही ना पडलाय’ असे म्हणत तोच त्याच्या हिमतीचा आणि ताकदीचा पुरावा म्हणून देत होते. त्यासाठी जाडजूड रिसर्च रिपोर्ट, मॅथेमेटिकल मॉडेल्स तोंडावर फेकत होते.

हवेचा एक मोठा झोका आला आणि तो इसम वर कड्यावर लटपटला; घसरत बराच खाली आलाय आणि एका झाडाच्या मुळाला पकडून लोंबकळत आहे; पुढे काय होईल माहीत नाही. त्याचे समर्थक / पाठीराखे अपेक्षेप्रमाणे जोरात आलेल्या वाऱ्याला दोष देत आहेत. त्याचे समर्थक / पाठीराखे हे मानायला तयार नाहीत की दमदार पावले टाकत, खाली टणक मोठ्या दगडांचा सपोर्ट घेत घेत, वारा आलाच तर आजूबाजूला आडोसा असेल असाच ट्रेकिंगचा मार्ग निवडत आणि मुख्य म्हणजे दारू न पिता.

तो इसम चढत राहिला असता, भले याच वेळेत कमी उंची गाठली असती, तर आता आलेला किंवा त्यापेक्षा जोरात वारा आला, तरी त्याला थोडे बहुत खाली यायला लागले असते; पण मागच्या दोन दिवसांसारखी अवस्था झाली नसती. त्या इसमाला आणि त्याच्या समर्थकांना माहीत आहे की वेळ पडलीच तर शासनाच्या बेल आउट पॅकेजचा फायर ब्रिगेड, ज्याच्या ड्रायव्हरचे नाव सेबी आहे, त्यांच्यासाठी धावून येईल.

कोरोनानंतर जगभरातील शेअर मार्केट झिंगल्यासारखी एका रेषेत वर चढत गेली आहेत. सगळीच्या सगळी ऐतिहासिक उंचीवर, एकाच वेळी !

कंपन्यांच्या शेअर्सचे भाव, त्या कंपन्यांची विक्री / नफा यांचे प्रतिबिंब असते. दुसऱ्या शब्दात ज्या वेगाने शेअरचे भाव वाढले त्या वेगाने, कमी-अधिक प्रमाणात, कंपन्यांचा वित्तीय परफॉर्मन्स देखील वाढला पाहिजे. पण कोणत्याच कंपन्यांचा परफॉर्मन्स दोन-तीन वर्षांत असा नाट्यपूर्ण वाढू शकत नाही. कल्पनेत वाढू शकतो, हे मान्य. पण वस्तुनिष्ठ प्रोजेक्शन्स आणि कल्पनाविलास यात मूलभूत फरक आहे.

आता कारणं दिली जात आहेत की वारा आला. कसला? तर अमेरिकेत मंदीची चाहूल लागली आहे, जपानच्या केंद्रीय बँकेने ३० वर्षांत पहिल्यांदा व्याजदर शून्यावरून ०.२५ इतके अबब वाढवले, इस्राईलने इराणमध्ये कोणाला घरात घुसून मारले इत्यादी.

शेअर मार्केटच्या फायनान्शियल ॲनॅलिसिसमध्ये एक टर्म आहे ‘फॅक्टरिंग इन द प्रोबेबल रिस्कस इन द करंट प्राइस.’

थिअरी वगैरे ठीक आहे, रिस्क फॅक्टर इन करायला रिस्क दिसली तरी पाहिजे, दिसली तरी त्याचे गांभीर्य मेंदूत रजिस्टर झाले पाहिजे; दारूत झिंगल्यावर काही दिसत नाही, ही अडचण आहे.

(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT