Punganur Cow Agrowon
ॲग्रो विशेष

Punganur Cow : जगातली सर्वात बुटकी 'पुंगनूर गाय' नामशेष होण्याच्या मार्गावर ; उंची अवघी ३ फूट

Mahesh Gaikwad

Indigenous Cow Breed : भारतात प्राचीन काळापासून घरोघरी गायी पाळण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी शेतकऱ्याच्या दावणीला किती गुरं यावरून त्याची श्रीमंती मोजली जायची. गोठ्यातल्या दावणीला जेवढी गायींची संख्या जास्त तेवढचं त्या घरचं दूधदुभतंही जास्त मानलं जायचं. पूर्वी गोठ्यात देशी गायींच प्रमाण जास्त असलेलं पाहायला मिळायचं.

पण काळ बदलत गेला तशी दावणीच्या देशी गायींची जागा संकरित गायींनी घेतली. दूध उत्पादनासाठी पशुपालकांचा ओढा संकरित गायी पाळण्याकडे वाढू लागला. संकरित गायीच्या तुलनेत देशी गायीचं दूध देण्याचं प्रमाण कमी असंत. त्यामुळे देशी गायीचा खर्च परवडत नसल्यानं आपसुकच देशी गायींची संख्या कमी होत गेली.

भारताचं वैभव असणाऱ्या अशाच काही देशी गायींच्या जाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात गायींच्या अनेक जाती पाहायला मिळतात. पुंगनूर ही देखील अशाच जातींपैकी एक भारतीय गाय आहे.

जगातील सर्वात छोट्या गाय म्हणून पुंगनूर गाय ओळखली जाते. अवघी अडीच ते तीन फूट इतकी उंची असणारी ही गाय सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्नही केले जात आहे.

पुंगनूर संवर्धन

पुंगनूर गायीची प्रजाती प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील चित्तुर जिल्ह्यामध्ये आढळते. येथील पुंगनूर गावाच्या नावानेच या गायीच्या प्रजातीला ओळख प्राप्त झाली आहे. पंरतु सध्या या गायीची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आंध्र प्रदेशमध्ये तिच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.

गोदावरी जिल्ह्यातील लिंगमपट्टी येथील गोआश्रमामध्ये या गायीच्या संवर्धनासाठी काम केले जात आहे. येथील गोशाळेत जवळपास ३०० पुंगनूर गायी असून त्यांच्या आरोग्याशी संबंधीत सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे. जगातील सर्वात छोटी गाय पाहण्यासाठी देशभरातील लोक आंध्र प्रदेशात येत असतात. शिवाय या गायी खरेदीही करतात.

जगातील सर्वात कमी उंचीची गाय

या गायीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीची उंची. पुंगनूर ही जगातील सर्वात कमी उंची असलेली गाय आहे. त्यामुळे या गायीला जगातील सर्वात कमी उंचीच्या गायीचा दर्जा प्राप्त झाला आहे.

या प्रजातीच्या गायीची गणना जगातील सर्वात कमी उंचीच्या गायींच्या प्रजातीमध्ये केली जाते. या गायीची उंची केवळ अडीचे ते तीन फूट असते. तर या गायीच्या नवजात वासराची जन्मावेळीची उंची अवघी १६ ते २२ इंच इतकी असते.

३ ते ५ लिटर दूध देते

पुंगनूर गायीची उंची कमी असल्यामुळे पशुपालकांना संगोपनासाठी खर्चही कमी प्रमाणात करावा लागतो. या गायीची उंची तीन फूट असली तरी ही गाय दिवसाला तीन ते पाच लिटरपर्यंत दूध देते. या गायीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असतात. अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून गायीचे दूध गुणकारी मानले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT