Team Agrowon
बऱ्यापैकी कोरडवाहू क्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गाव लाल कंधारी गोवंशाच्या संगोपनासाठी प्रसिध्द आहे.
याच गावातील अनंत लाड हे २० वर्षांहून अधिक काळापासून लाल कंधारी या देशी गोवंशाचे संवर्धन आणि संगोपन करत आहेत.
लाल कंधारीसह देवणी जातीच्या गोवंशाच्या संगोपनातून लाड यांची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
शेती कामासाठी लाल कंधारी बैलजोडी अत्यंत्य उपयोगी ठरते. गावात काही शेतकऱ्यांनी देवणी गोवंशाचेही संगोपन केले आहे.
सध्या त्यांच्याकडे ११ जनावरे असून यामध्ये गायी-वासरांसह दोन लाल कंधारी आणि एक देवणी जातीचा वळू आहे.
शेतीकामाला सरस असल्याने लाल कंधारी बैलांना चांगली मागणी असते. लाल कंधारीच्या एका वळूची किंमत एक लाखांच्या आसापास असते.
लाड यांनी पशुपालकांची गरज लक्षात घेता लाल कंधारी वळूचा नैसर्गिक रेतनासाठी वापर सुरू केला आहे. यातून त्यांना वर्षाकाठी वर्षाकाठी साडेतीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.
परभणी, लातूर, नांदेड, वाशिम या जिल्ह्यातील अनेक शेतकरी नैसर्गिक रेतनासाठी गायी लाड यांच्या शेतावर घेवून येतात.
अनेक पशुप्रदर्शनांमधील स्पर्धांमध्ये लाड यांच्या पशुधनाने पारितोषिके मिळवली आहेत. नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या महापशुधन एक्स्पोमध्येही त्यांच्या पशुधनाला पारितोषिक मिळाले आहे.