Team Agrowon
संख्यात्मक दृष्टीने शुद्ध देशी गोवंश अत्यंत कमी असताना पशुविज्ञानाचे आव्हान म्हणून निवडीचे जातिवंत वळू पैदाशीसाठी मिळविणे गरजेचे ठरते.
पैदाशीच्या वळूची जनुकीय अभियांत्रिकी पडताळणी करण्याची नियोजन पद्धती अत्यंत महत्त्वाची असून, केवळ अशा निवड झालेल्या वळूकडून शुद्ध वंशाची पिढी अपेक्षित आहे.
गायींच्या बाबतीत वर्षाच्या आत पहिला माज, दर वर्षी वासरू आणि आयुष्यात २० वेत असे आव्हान किती गोपालक स्वीकारतील, याची चर्चा करावी लागेल.
दूध विचार नकोच म्हणून गोमूत्र, गोमयसाठीचा बहुसंख्य देशी वंशरहित गोवंश निरोगी सांभाळणे आणि हळूहळू नियोजनबद्ध पैदाशीतून शुद्धतेकडे वळविणे शक्य आहे.
देशी वंशरहित गोधन नेमका कोणत्या शुद्ध वंशात परावर्तित करायचा याचा निर्णय नोंदी, पशुवैद्यक, शिफारशी आणि स्थानिक गरज यातून शक्य आहे.
देशी गोवंश संवर्धन आणि विकासासाठी झालेले अनेक प्रयत्न पडताळताना प्रत्येक राज्यात शासनाने ‘पशुधन विकास मंडळ’ निर्माण करून स्थानिक गोवंश जाती संवर्धनाचे उद्दिष्ट निर्धारित केले.
देशात साधारणपणे २० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अशा यंत्रणांची कार्यात्मक साध्यता सहसा कुणी तपासणी करत नाही.
एक हजार गोधनाचे गोकूळग्राम अद्याप दिवास्वप्न आहे. प्रत्येक राज्यात पशुसंवर्धन विभाग आणि पशुवैद्यक विद्यापीठात स्थानिक गोवंशाची मोठी प्रक्षेत्रे आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.