Tehsildar Protest
Tehsildar Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Tehsildar Protest : तहसील कार्यालयांत कामे खोळंबली

Team Agrowon

Alibag News : प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार सोमवारपासून संपावर गेले आहेत. त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाची (Protest) भूमिका घेतल्याने नागरिकांची कामे खोळंबण्याची शक्‍यता आहे. तालुका स्तरावरील सर्व सरकारी कामेही रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.

महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग दोन हे अत्यंत महत्वाचे पद मानले जाते. परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग दोनचे नसल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढवण्याबाबत १९९८ पासून सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. अनेकदा बैठकांमध्ये आश्‍वासने देण्यात आली, मात्र पुढे कार्यवाही झाली नाही.

आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांसह कर्मचारी व नागरिकांच्या कामावर झाला. सोमवार असल्याने जमिनीबाबतच्या प्रकरणांची सुनावणी रखडली. उत्पन्न, जातीचा दाखला, वय, अधिवास दाखला, वारस नोंदणी अशी अनेक कामेही खोळंबली.

ग्रामीण भागातील कष्‍टकऱ्याचे हाल

पेण (वार्ताहर) : राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक नागरीकांची कामे खोळंबली आहेत.

शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी यासह असंख्य नागरीकांच्या तसेच ज्‍येष्ठ नागरिकांच्या समस्या ज्या कार्यालयात सोडविल्या जातात किंवा अनेक प्रकारच्या योजना ज्या कार्यालयातून राबविल्या जातात अशा महसूल कार्यालयातील अधिकारी संपावर गेल्याने अनेकांचे काम न झाल्यामुळे हाल झाले आहे.

खालापूरमध्ये अधिकाऱ्यांविना कामे जाेरात

खालापूर : वरिष्ठ अधिकारी नसले की कनिष्ठ कर्मचारी कामात दिरंगाई करतात, हा समज खालापूर तहसीलमधील कर्मचाऱ्यांनी खोडून काढल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.

दर्जा वर्ग दोन चा आणि वेतनश्रेणी दर्जा तीनची यामुळे नाराज असलेले नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन केले. त्यामुळे शासकीय कामाचा गाडा थांबेल, अशी परिस्थिती ओढावेल असे वाटत होते.

परंतु तहसील कार्यालयात काम बंद आंदोलनाचा कोणताही परिणाम पुरवठा विभाग, महसूल विभाग, निवडणूक विभागात दिसून आला नाही. सर्व कर्मचारी कामावर वेळेत हजर राहून कामांचा निपटारा करताना दिसले. तहसील कार्यालय नेहमीप्रमाणे गजबजल्याचे होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT