Watermelon Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : कलिंगड हंगामास पावसाचा फटका

Watermelon Crop Damage : खानदेशात कलिंगडाची लागवड यंदा कमी झाली आहे. मागील हंगामात किंवा उन्हाळ्यातील कमी दर व विषम वातावरणाचा फटका बसल्याने क्षेत्र कमी राहिले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कलिंगडाची लागवड यंदा कमी झाली आहे. मागील हंगामात किंवा उन्हाळ्यातील कमी दर व विषम वातावरणाचा फटका बसल्याने क्षेत्र कमी राहिले आहे. खरिपातील पपईला मागणी असते यामुळे काहींनी लागवड केली, पण पावसाचा फटका पिकास बसला आहे.

कलिंगड लागवडीसाठी खानदेशात जळगावमधील चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे हा भाग प्रसिद्ध आहे. दरवर्षी दोन हंगामांत कलिंगड लागवड असते. रब्बीत नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीत कलिंगड लागवड केली जाते. तर खरिपात जुलै व ऑगस्टमध्ये लागवड केली जाते. अनेक शेतकरी केळी पिकात आंतरपीक म्हणून कलिंगडाचे पीक घेतात.

रब्बीत काही शेतकरी कापूस पीक काढून त्यात कलिंगड घेतात. मागील हंगामात डिसेंबर किंवा सुरुवातीला लागवड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना मागील वेळेस दर बऱ्यापैकी मिळाले होते. पण उन्हाळ्यात लागवडीच्या कलिंगडास हवे तसे दर नव्हते. मागील वर्षी जागेवर सरासरी सहा प्रतिकिलोचा दर होता.

तसेच काही शेतकऱ्यांना विषम वातावरणामुळे नुकसानीचा सामना करावा लागला होता. यामुळे खरिपात यंदा काही शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन टाळले. तसेच काहींनी लागवड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खरिपातील कलिंगड खानदेशात सुमारे २०० हेक्टरवर आहे. जामनेरात सुमारे ८० हेक्टरवर खरिपातील कलिंगड पीक आहे.

कलिंगडाचा खर्चही वाढला आहे. त्यात मल्चिंग पेपरचे दर १५०० ते १७०० रुपये प्रतिरोल, असे आहेत. तसेच बियाणेदेखील महाग आहे. या पिकास विद्राव्य खते व महागडी कीडनाशकेदेखील लागतात. दुसरीकडे दरांची हमी नाही. यामुळे अनेकांनी लागवड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पावसाचा फटका बसला आहे. खानदेशात दरवर्षी रब्बीमध्ये ८०० ते ९०० हेक्टरवर कलिंगडाची लागवड होते. तर खरिपात ३०० ते ३५० हेक्टरवर कलिंगड असते. परंतु यंदा लागवड कमी झाली आहे.

सतत पाऊस व नुकसान

कलिंगड हे नाजूक वेलवर्गीय पीक आहे. अतिपावसात पीकहानी होते किंवा उत्पादन कमी येते. यंदा जून, जुलै व ऑगस्टमध्ये अधिकचा पाऊस झाला. पाचोरा, जामनेर भागात काही शेतकऱ्यांना एकरी सहा ते सात टन उत्पादन आले आहे. कमाल उत्पादन १० टनांपेक्षा अधिक नाही. लागवड जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही झाली आहे. यामुळे आवक ऑक्टोबरअखेरपर्यंत सुरू राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT