Water Storage in Dams Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage in Dams : देशाच्या प्रमुख १५३ जलाशयांमध्ये १५३ अब्ज घनमीटर, तर राज्याच्या सर्व २९९७ धरणांमध्ये ८४.४७ टक्के पाणीसाठा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : यंदा राज्यासह देशाच्या विविध भागात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रमुख धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. देशाच्या प्रमुख १५३ जलाशयांमध्ये १५३ अब्ज घनमीटर पाणीसाठा झाला आहे. तर राज्याच्या सर्व २९९७ धरणामधील पाणीसाठा ८४.४७ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे राज्यासह देशात शेतीच्या पाण्यासह पिण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

देशातील पाणीसाठा

केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) या आठवड्यातील माहितीनुसार १२ सप्टेंबरपर्यंत देशातील १५३ प्रमुख जलाशयांमध्ये पाणीसाठा १५३.७५७ अब्ज घनमीटर (बीसीएम) झाला आहे. जो एकूण क्षमतेच्या ८५ टक्के आहे. तर गेल्या वर्षी याच वेळी पाणीसाठा ११९.४५१ बीसीएम होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपातळीत २८.७१ टक्के तर सर्वसाधारण पाणीसाठ्याच्या तुलनेत १७.७३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

राज्यातील पाणीसाठा

राज्यातील सर्व २९९७ धरणातील पाणीसाठा ८४.४७ टक्क्यांवर पोहचला आहे. जो गेल्या हंगामात याच दिवशी ६७.८२ टक्क्यांवर होता. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार नागपूर विभागात ३८३ प्रकल्प येतात. ज्यात ८३.८९ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील २६४ प्रकल्पात ८७.९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील ९२० प्रकल्पातील पाणीसाठा ६९.०९ टक्क्यांवर पोहचला आहे. नाशिक विभागातील ५३७ आणि पुणे विभागातील ७२० प्रकल्पात अनुक्रमे ७९.७०, ९०.६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागातील पाणीसाठा सर्वाधिक झाला असून येथील १७३ प्रकल्पात ९३.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

विभागानुसार देशातील पाणीसाठा

१) देशाच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमधील जलाशयांत ६८ टक्के पाणी आहे. उत्तर भागातील ११ प्रमुख जलाशयात १९.८३६ बीसीएम पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षा पाणीसाठा १३.४६८ बीसीएम होता.

२) पूर्वेकडील आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड आणि बिहार राज्य येतात. या राज्यातील २५ जलाशयांत २०.७८९ बीसीएम पाणीसाठा झाला आहे.

३) पश्चिम विभागात गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा समावेश होतो. येथील ५० जलाशयांचा पाणीसाठा ३७.३५७ बीसीएम पाणीसाठा आहे. जो एकूण क्षमतेच्या ९० टक्के आहे. गत वर्षी याच वेळी पाणीसाठा ७५ टक्के होता.

४) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यां राज्यांचा समावेश मध्य प्रदेश विभागात होतो. येथील जलाशयांमध्ये १२ तारखेपर्यंत ४८.२२७ बीसीएम पाणीसाठा झाला असून एकूण क्षमतेच्या ८९ टक्के आहे.

५) आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांचा समावेश असणाऱ्या दक्षिण विभागात ४३ जलाशय आहेत. या जलाशयांमध्ये ४८.१५८ बीसीएम पाणीसाठा झाला असून जो एकूण क्षमतेच्या ८८ टक्के आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT