Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : उजनी धरणाची पाणीपातळी पोहोचली उणे ५० टक्क्यांवर

Ujani Dam Water Level : यंदा कमी झालेले पाऊसमान आणि त्यात सातत्याने होणारा पाण्याचा उपसा, बाष्पीभवन यांसारख्या विविध कारणांनी जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्य़ा उजनी धरणाची पाणीपातळी वरचेवर घटत चालली आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : यंदा कमी झालेले पाऊसमान आणि त्यात सातत्याने होणारा पाण्याचा उपसा, बाष्पीभवन यांसारख्या विविध कारणांनी जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्य़ा उजनी धरणाची पाणीपातळी वरचेवर घटत चालली आहे.

मंगळवारी (ता.१४) धरणातील पाण्याने उणे ५० टक्क्यांची पातळी गाठली. गेल्या १० ते १२ वर्षांत मे महिन्याच्या मध्यावतधीत पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा उणे ५० टक्क्यांवर गेला आहे.

सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यांतील प्रमुख शहरासंह सुमारे १२५ हून अधिक पाणी योजना या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्याशिवाय उजनीच्या पाण्यावर जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र भिजते. मात्र यंदा पाण्याची स्थिती चिंताजनक झाली आहे. शेतीसाठी पाणी बंद करण्यात आले आहे. केवळ पिण्यासाठी ते राखीव ठेवण्यात आले आहे.

सध्या सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले आहे, हे पाणी २० मेपर्यंत औज बंधाऱ्यात पोहोचेल. त्या वेळी उजनी धरणाची पाणीपातळी उणे ५७ ते ५८ टक्के होईल. २१ मे ते पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील उर्वरित मृतसाठा पिण्यासाठीच राखून ठेवावा लागेल. आता धरण रिकामे झाले तर पावसाळा लांबल्यास जिल्ह्यातील टंचाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाच वर्षांनंतर उद्‍भवली परिस्थिती

पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात अशीच दुष्काळजन्य स्थिती उद्‌भवली होती. पाऊसही लांबणीवर पडला होता आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे २०१८-१९ मध्ये पुढच्या वर्षीचा पावसाळा सुरू होईपर्यंत धरण उणे ५९ टक्के झाले होते. मात्र यंदा धरणातील पाणीसाठा उणे ६५ टक्क्यांहून अधिक खोलवर जाईल, अशी शक्यता आहे.

उजनीतील पाणीसाठा स्थिती

उजनी धरणामध्ये बुधवारी (ता.१४) एकूण पाणीपातळी ४८६.२८० मीटरपर्यंत होती, तर एकूण पाणीसाठा ३७.०२ टीएमसी एवढा होता, तर त्यापैकी उणे २६.६४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता. या पाण्याची टक्केवारी उणे ४९.७२ टक्के इतकी होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT