Agriculture Well Agrowon
ॲग्रो विशेष

Well Water Level : सोलापुर जिल्ह्यात विहिरींची पाणीपातळी १.५१ मीटरने वाढली

Water Level Update : सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे निरीक्षण विहिरींची पाणीपातळी १.५१ मीटरने वाढली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे निरीक्षण विहिरींची पाणीपातळी १.५१ मीटरने वाढली आहे. भूवैज्ञानिक विभागाने सप्टेंबरमध्ये केलेल्या पाहणीत ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या दृष्टीने काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात १५९ निरीक्षण विहिरीची पाणीपातळी भूवैज्ञानिक विभागाकडून मोजली जाते. वर्षात जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर या महिन्यात चारवेळा या निरीक्षण विहिरींची पाणीपातळी मोजली जाते, यात पावसाळ्याआधी मे महिन्यात आणि पाऊस हंगाम संपल्यानंतर सप्टेंबरअखेर मोजणी केलेली पाणीपातळी महत्त्वाची मानली जाते.

यंदा पडलेल्या पाऊस आणि निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीचा अहवाल यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे सोईचे होते. जिल्ह्यात यंदा सप्टेंबरअखेर तब्बल ६२२.१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ४८१.१ मिलिमीटर आहे. त्यातुलनेत यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. पण पावसाने सरासरी ओलांडली आहे. भूजलपातळीतही आता दिलासादायक वाढ झाली आहे.

तालुकानिहाय पाणी पातळीत झालेली वाढ (मीटरमध्ये)

उत्तर सोलापूर- २.२७, दक्षिण सोलापूर-३.२७ अक्कलकोट-४.२३, बार्शी-१.७७, पंढरपूर-२.८९, माळशिरस-३.५८, मंगळवेढा-२.४८, सांगोला-३.९१, माढा-३.६८, मोहोळ-३.१६, करमाळा-३.१०

उत्तर सोलापूर- २.२७, दक्षिण सोलापूर-३.२७ अक्कलकोट-४.२३, बार्शी-१.७७, पंढरपूर-२.८९, माळशिरस-३.५८, मंगळवेढा-२.४८, सांगोला-३.९१, माढा-३.६८, मोहोळ-३.१६, करमाळा-३.१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT