Ujani Dam Water agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : ‘उजनी’तील पाणीपातळी ७५ टक्क्यांवर

Ujani Dam Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणाकडून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : पुणे जिल्ह्यातील धरणाकडून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. धरणातून ६२ हजार ७८८ क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याच्या या वाढत्या विसर्गामुळे शनिवारी (ता. ३) धरणातील पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या घरात पोहोचली, तर धरणातील एकूण पाणीसाठा १०३.७२ ‘टीमसी’पर्यंत पोहोचला.

उजनी धरण यंदाच्या वर्षी जानेवारीमध्येच उणे पातळीत गेले होते. पण दहा दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आणि उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणातील अतिरिक्त पाणी उजनीकडे सोडण्यास सुरुवात झाली.

परिणामी, धरणाची पातळी अधिकमध्ये आलीच, पण ती आता तब्बल ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. वरच्या धरणाकडून टप्प्या-टप्प्याने पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात आला. पण पाण्याच्या अखंड विसर्गाने आणि वेगामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली.

शनिवारी (ता.३) धरणाकडे ६२ हजार ७८८ क्युसेक इतक्या विसर्ग सुरू होता. त्यामुळे धरणातील एकूण पाणी पातळी ४९५.६३० मीटरपर्यंत पोहोचली. तर एकूण पाणीसाठा १०३.७२ टीएमसी राहिला.

त्यापैकी उपयुक्त साठा ४०.६ टीएमसी आणि या पाण्याची टक्केवारी ७४.७७ टक्के झाला. हा विसर्ग असाच राहिल्यास धरण दोन दिवसात शंभर टक्क्यांची पातळी गाठेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT