Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Water Stock : उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव

Water Crisis : सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाही यातून चालतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला होता.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Solapur News : उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणेपातळीत गेला आहे, त्यामुळे शेतीला चौथे आवर्तन देताना खूप विचार करावा लागेल, धरणातील हे उर्वरित पाणी जूनअखेरपर्यंत पिण्यासाठीच राखीव ठेवावे लागेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२६) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. पालकमंत्री पाटील म्हणाले, की उजनी धरणात जेवढे पाणी आहे, तेवढे आपण जपून वापरत आहोत. उजनी धरण सध्या उणेमध्ये गेले आहे. मात्र जून अखेरपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही उणेमधील पाणी आपल्याला पुरेल.

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाही यातून चालतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला होता. उजनी धरण ओव्हरफुल्ल झाले होते. त्यामुळे आपण गेल्या वर्षी सहा आवर्तने शेतीला दिली होती.

मात्र या वर्षी तिसऱ्या आवर्तनानंतर चौथे आवर्तन देण्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागेल. धरणातील उणे साठ्यातील पाणी शेतीला फार देता येणार नाही.

प्राधान्याने ते पिण्यासाठी द्यावं लागेल. त्यामुळे उजनी धरणातील सध्याचे पाणी हे जून अखेरपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवावं लागेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT